काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून द्या : हजारवाडी, भिलवडी स्टेशनला झुकते माप देणार ; आमदार डॉ. विश्वजीत कदम
भिलवडीचे माजी सरपंच राहुल कांबळे यांचेही बहारदार शैलीमध्ये लोकांना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन






दर्पण न्यूज भिलवडी /पलूस (अभिजीत रांजणे) :- पलूस कडेगांव मतदार संघातील कै डॉ पतंगराव कदम साहेब यांनी विविध विकासकामे केली. अनेक लोकांना भारती विद्यापीठ माध्यमातून नोकर्या दिल्या. कै डॉ पतंगराव कदम साहेब यांचा आदर्श घेऊन मी ही मतदार संघाचा विकास करीत आहे.भिलवडी जिल्हा परिषद गट, वसगडे पंचायत समिती गणातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून द्या. हजारवाडी आणि भिलवडी स्टेशनला झुकते माप देणार, असे आश्वासन आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी हजारवाडी, भिलवडी स्टेशनच्या बैठकीत दिले.
यावेळी आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी सांगितले की, भिलवडी जिल्हा परिषद गटातून काँग्रेसकडून प्रतिक पाटील आणि वसगडे पंचायत समिती गणातून शोभा हजारे, माळवाडी पंचायत समिती गणातून हजराबी सलामत निवडणुकीस उभे राहिले आहेत. भिलवडी जिल्हा परिषद गटातील उमेदवार प्रतीक पाटील यांना कै बाळासाहेब काका पाटील यांचा वारसा आहे. कै बाळासाहेब काका पाटील यांनी बारावाड्यातील आणि गावातील प्रश्न सोडविले आहेत. प्रतिक पाटील यांचे वडिल कै संग्राम पाटील यांनी लोकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. जिल्हा परिषद माध्यमातून अनेक गावचा विकास साधला होता. आज ते नाहीत आपल्या लहान भावाप्रमाणे प्रतीक पाटील आहेत त्यांना आपण सहकार्य करावे आणि निवडून द्यावे.
भिलवडी स्टेशन येथे आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी सांगितले की नेहमीच कै पतंगराव कदम साहेबांना या भागातील ग्रामस्थांनी आणि कार्यकर्त्यांनी सहकार्य केले होते. मलाही मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यास सहकार्य केले आहे. 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकी च्या काँग्रेसच्या उमेदवारांना ही आपण मोठ्या मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी केले.
हजारवाडी येथे भिलवडीचे माजी सरपंच राहुल कांबळे यांनीही आपल्या बहारदार शैलीमध्ये लोकांना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले.
हजारवाडी आणि भिलवडी स्टेशन येथील डॉ विश्वजीत कदम यांच्या बैठकीला निवडणुकीस उभे असलेले उमेदवार आणि अनेक गावांतील काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी, पत्रकार बांधव, महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




