महाराष्ट्रराजकीय

शिवसेना उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख तथा येडशीचे माजी उपसरपंच विजयबापू सस्ते यांचा अनेक शिवसैनिकांसह भाजपात जाहीर प्रवेश

दर्पण न्यूज धाराशिव (प्रतिनिधी संतोष खुने) :-

शिवसेना उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख तथा येडशीचे माजी उपसरपंच श्री. विजयबापू सस्ते यांनी त्यांच्या असंख्य शिवसैनिकांसह आज भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशप्रसंगी शिवसेना उबाठा गटाचे विभागप्रमुख श्री. विनोद पवार, माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. अमर पवार, श्री. रुपेश तपसे, श्री. रुपेश पवार, श्री. परमेश्वर पवार, श्री. अनिकेत गुरव, श्री. आदित्य पवार, श्री. अविनाश माने, श्री. विलास काळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. या सर्वांचे पक्षात मनःपूर्वक स्वागत करून त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रवेशामुळे येडशी गट व दोन्ही गणातील महायुतीच्या उमेदवारांचा विजय आणखीन सोपा झाला आहे.

उबाठा गटात भ्रमनिरास झाल्याने आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास केवळ भाजपा महायुतीच करू शकते, या दृढ विश्वासातून गेल्या आठवड्यात उबाठा शिवसेनेतील महत्त्वाचे नेते त्यात ढोकीचे श्री. संग्राम देशमुख, चिलवडीचे श्री. शाम जाधव, सांजाचे श्री. गफूर शेख आणि असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. आज येडशीचे श्री. विजयबापू सस्ते यांनीही मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला आहे. हा प्रवेशाचा प्रवाह अजूनही अविरत सुरू राहणार आहे.

यावेळी श्री.दत्ताभाऊ कुलकर्णी, श्री.अनिल काळे, श्री.नितीन भोसले, येडशी जिल्हा परिषद गटातील भाजपा महायुतीचे उमेदवार श्री. संजयकाका लोखंडे, पंचायत समितीच्या उमेदवार सौ. शुभांगी सुधीर सस्ते यांच्यासह येडशी येथील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!