सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी

दर्पण न्यूज भिलवडी ;- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती 26 जून 2025 रोजी साजरी करण्यात आली.
यावेळी भिलवडी येथील पत्रकार दर्पण न्यूजचे संपादक अभिजीत रांजणे बापू यांचे शुभ हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला व वाचनालयाचे वतीने अभिवादन करण्यात आले.
प्रारंभी वाचनालयाचे कार्यवाह सुभाष कवडे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.
यावेळी पत्रकार अभिजीत रांजणे बापू म्हणाले, राजर्षी शाहू महाराज कृतिशील समाज सुधारक होते, समतेचे पुजारी होते, त्यांनी शिक्षणावर भर दिला. सदैव प्रजेची काळजी घेतली. बोर्डिंग व्यवस्थेचे जनक म्हणून शाहू महाराज ओळखले जातात.
शेवटी उपाध्यक्ष डी आर कदम सर यांनी आभार मानले.
यावेळी संचालक जयंत केळकर, ग्रंथपाल मयुरी नलवडे, प्रमुख लेखनिक विद्या निकम आणि बहुसंख्य वाचक उपस्थित होते.