भिलवडी येथे 15 रोजी चक्काजाम आंदोलन

दर्पण न्यूज भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथे चक्काजाम राज्य सरकारने निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचे जाहीर केले होते परंतु अद्यापही दिलेला शब्द शासनाने पाळलेला नाही, त्याची अंमलबजावणी तात्काळ व्हावी म्हणून माजी मंत्री दिव्यांगांचे नेते आमदार बच्चुभाऊ कडू हे आठ दिवस झाले अमरण उपोषणाला बसलेले आहेत त्यांची प्रकृती खालावलेली असून शासन हे त्यांच्या जीवाशी व शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळत आहे बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन रविवारी दिनांक 15 रोजी सकाळी 10.30 भिलवडी ग्रामपंचायत समोर कमानीजवळ होणार आहे तरी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भिलवडी व परिसरातील तमाम शेतकरी , शेतमजूर,व्यापारी, विविध संघटना व सुज्ञ नागरिक बंधू- भगिनींनी उद्या रविवार दि.15 रोजी सकाळी ठीक10.30 वा उपस्थित रहावे ही नम्र विनंती
पोपटांना मोर. संदीप राजोबा
जिल्हाध्यक्ष , जिल्हा कार्याध्यक्ष
स्वाभिमानी शेतकरी संघटना