. 


दर्पण न्यूज सांगली/भिलवडी : सांगली रेल्वे स्टेशन येथे शिवसेना क्रीडासेना आयोजित दिल्ली येथील सिंदूर आर्मी महारक्तदान यात्रेच्या विशेष रेल्वेला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, संभाजी भिडे गुरुजी यांनी भगवा झेंडा दाखवून यात्रेचा शुभारंभ केला. या महारक्तदान यात्रेला निघालेल्या रेल्वेचे उपस्थितांनी जल्लोषात स्वागत केले. रक्तदान दि. ९ ऑगस्ट २०२६ – क्रांती दिन. ठिकाण : आर्मी कमांड हॉस्पिटल, रिसर्च अँड रेफरल, नवी दिल्ली येथे आहे.
या शुभारंभ प्रसंगी शिवसेना क्रीडासेना प्रमुख डब्बल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील ,मा.आ. शहाजी बापू पाटील, आमदार. सुहास बाबर, आरोग्य दूत मंगेश चिवटे , माजी सैनिक, विविध क्षेत्रातील मान्यवर,रक्तदाते पैलवान, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेना क्रीडासेना प्रमुख डब्बल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील यांनी दिल्ली येथील सिंदूर आर्मी महारक्तदान यात्रेचे अतिशय सुंदर नियोजन केले आहे.
