
दर्पण न्यूज मिरज सांगली:-अभिजीत रांजणे
दिल्ली येथील आर्मी कमांड हॉस्पिटलमध्ये दि. ९ ऑगस्ट रोजी सुमारे हजार शिवसैनिक रक्तदान करणार आहेत. दि. ६ रोजी दुपारी १ वाजता ‘श्री-नाथ एक्सप्रेस’ या विशेष रेल्वेद्वारे जिल्ह्यातील क्रीडासेनेचे शिवसैनिक दिल्लीला जाणार आहेत. सिंदूर आर्मी महारक्तदान यात्रेचे हे दुसरे वर्ष आहे ,अशी माहिती सांगली(सर्किट हाऊस), येथे शिवसेना क्रीडासेना प्रमुख डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, संजय विभूते, गौरव नायकवडी, मोहन वनखंडे, सुनीता मोरे व पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
चंद्रहार पाटील सांगितले की, रक्तदान यात्रेचे यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. भारतीय जवानांसाठी विशेष रेल्वेद्वारे जाऊन सामुहिक रक्तदान करणारा शिवसेना हा देशातील पहिलाच पक्ष आहे. प्रत्येक तरुण सीमेवर लढू शकत नसला तरी रक्तदान करुन त्याची देशभक्ती नक्कीच व्यक्त करु शकतो आणि वेळ पडलीच तर सेनेसाठी शिवसेना नेहमीच हजर आहे. उद्योगमंत्री उदय सामंत, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, आ. सुहास बाबर, शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार, दि. ६ ऑगस्ट रोजी सांगली स्टेशनवरुन विशेष रेल्वेद्वारे ‘श्री-नाथ एक्सप्रेस’ ला हिरवा झेंडा दाखवून यात्रेचा प्रारंभ होणार आहे. नवी दिल्ली येथे होणाऱ्या रक्तदा कार्यक्रमास केंद्रीय संरक्षणमंत्री राजना एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, ख श्रीकांत शिंदे व शिवसेनेचे खासदार आि मंत्री प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
