
दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी( शिराज शिकलगार) :- सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा पोलीस ठाणे हद्दीतील आज वटसावित्री पौर्णिमा या पार्श्वभूमीवर विटा उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांच्या आदेशानुसार विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी विटा शहरातील तमाम सर्व माता भगिनी महिला वर्गांना सूचना जारी केले आहेत, वटसावित्री पौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो, महिला आपल्या गळ्यामध्ये अलंकार सोन्याचे दागिने घालून साज करत असतात, हा महिलांचा सण असल्याने वटसावित्री पौर्णिमे दिवशी वडाला पूजन करण्यासाठी सर्व महिला माता-भगिनी जात असतात, विटा शहरातील कराड रोड, खानापूर रोड, विटा पोलीस ठाणे समोर, तासगाव रोड, तसेच ब्राह्मण गल्ली, बर्वे वाडा, जुना दत्त मंदिर, तसेच महादेव मंदिर, या ठिकाणी वटसावित्री पौर्णिमेच्या अनुषंगाने महिला वडाचे पूजन करण्यासाठी जातात. या ठिकाणी महिलांची गर्दी होत असते, या गर्दीचा फायदा किंवा रस्त्यावरून जाताना आजूबाजूचे वातावरण पाहून सोनसाखळी चोरटे कधीही महिलांच्या गळ्यातले दागिने हिसडा मारू शकतात, त्यामुळे विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी माता भगिनींनीना वटसावित्री व्रत पौर्णिमेच्या निमित्ताने आव्हान केले आहे की, आपल्या गळ्यातील दागिने सुरक्षित ठेवा, तसेच खबरदारी घ्या, वड पुजायला जाताना जास्त दागिन्यांचा वापर करू नका, सौभाग्यवतीचे लेणं तसेच अलंकार हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे, त्यामुळे आपण आपलं सौभाग्य याने मनी मंगळसूत्र तसेच अन्य दागिने याकडे लक्ष केंद्रित करून रस्त्यावरून जाताना किंवा गर्दीच्या ठिकाणी महिलांनी खबरदारी घ्या, जर वड पूजन करण्यासाठी जात असताना महिलांना सूचना आहे की एखादा अनोळखी किंवा संशयित व्यक्ती आढळला अथवा निदर्शनास आल्यास महिलांच्या रक्षणासाठी 112 डायल नंबर आपण कधीही केव्हाही संकटकाळी हा नंबर डायल करू शकता, तसेच नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधू शकता, तेव्हा महिलांनी वडाचे पूजन करताना आपल्या गळ्यातील दागिन्यांची खबरदारी घ्या, विटा पोलिसांनी केलेल्या आव्हानाचे पालन करावे,तसेच वट सावित्रीच्या पौर्णिमा निमित्ताने विटा पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवला आहे,तर महिला पोलिसांची टीम सज्ज ठेवले आहे, सतत डायल 112 सर्व मार्गावर पेट्रोलिंग करत असणार आहेत, अशी माहिती दैनिक प्रीतीसंगमचे खानापूर विटा प्रतिनिधी शिराज शिकलगार यांना विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिली.