दर्पण न्यूज कोल्हापूर – अनिल पाटील
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.*
सोमवार, २७ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता गारगोटी, ता. भुदरगड येथील निवासस्थान येथून पक्ष कार्यालय खानविलकर पेट्रोल पंप शेजारी कोल्हापूरकडे प्रयाण. दुपारी ३ वाजता पक्ष मध्यवर्ती कार्यालय खानविलकर पेट्रोल पंप येथे आगमन व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीतस उपस्थिती. दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत कामकाजाच्या आढावा बैठकीस उपस्थिती. सायंकाळी ५.३० वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शेंडा पार्क, नूतन सभागृह, आर. के. नगर रोड येथे आगमन व समीर देशपांडे लेखक, पत्रकार यांच्या कोरोनाशी भिडताना या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास उपस्थिती. सोयीनुसार शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे आगमन. रात्री ८. ३० वाजता शासकीय विश्रामगृह येथून छत्रपती शाहू महाराज टर्मिनसकडे प्रयाण. रात्री ८.४० वाजता छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे आगमन. रात्री ८.५० वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.