
दर्पण न्यूज पलूस भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथे जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी सहेली आणि काकासाहेब चितळे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली ‘वॉकथॉन’ स्पर्धा अत्यंत जल्लोषात आणि चैतन्यमय वातावरणात पार पडली. फिटनेस आणि मनोरंजनाचा अनोखा संगम असलेल्या या उपक्रमात भिलवडी आणि परिसरातील ६५० हून अधिक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आरोग्याचा जागर केला.
कार्यक्रमाची सुरुवात ओंकार रोकडे आणि त्यांच्या टीमने घेतलेल्या धमाकेदार झुंबा डान्सने झाली. वॉर्म-अपसाठी सुरू झालेल्या या डान्समध्ये महिला इतक्या रंगून गेल्या होत्या की वॉकथॉन सुरू होण्यापूर्वीच भिलवडीत जणू एखादा डान्स फेस्टिवल सुरू असल्याचे चित्र दिसत होते. भारतीय विद्यापीठाच्या फिजिओथेरपिस्ट टीमने महिलांना शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व सांगून स्पर्धेसाठी सज्ज केले. त्यानंतर भिलवडी सेकंडरी हायस्कूलपासून भुवनेश्वर वाडीपर्यंत या धमाल वॉकथॉनला सुरुवात झाली.
या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरल्या त्या ८० वर्षांच्या राजमती शेडबाळकर आजी. त्यांचा उत्साह आणि आत्मविश्वास पाहून उपस्थित तरुणींनीही त्यांचे विशेष कौतुक केले. या वॉकथॉनमध्ये वयोगटानुसार चुरस पाहायला मिळाली. १५ ते ४० वयोगटात सानिका अनिल कदम, ४० ते ५० वयोगटात वैशाली अनिल मेहत्रे, तर ५० ते ६० वयोगटात कांचन आनंदराव धाबुगडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे ६५ वर्षांवरील वयोगटातही सव्वाशेहून अधिक महिलांनी सहभाग नोंदवून तरुणांना लाजवेल असा वेग आणि जिद्द दाखवली.जायन्ट्स ग्रुप ऑफ सहेली व काकासाहेब चितळे फाऊंडेशन यांनी नारी संजीवनी वॉल्कथोन स्पर्धा 2026 सिजन 1 चे आयोजन केले .
सर्व कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व व्यवस्थापन सौ.भक्ती चितळे, श्री.मकरंद चितळे, श्री. गिरीश चितळे जायन्ट्स ग्रुप ऑफ सहेलीच्या अध्यक्षा सौ.उज्वला परीट,सौ.चैत्राली कुलकर्णी, सौ.स्मिता वाळवेकर, सौ.अश्विनी मगदूम, सौ.आशाराणी महिंद, सौ. स्नेहा शेडबाळकर, सौ.सविता सूर्यवंशी, सौ.सीमा शेटे,सौ.अनिता गुरव व सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच जायन्ट्स ग्रुप भिलवडीचे अध्यक्ष, पदाधिकारी व सदस्य
जायन्ट्स वेलफेअरचे केंद्रीय समिती सदस्य, जायन्ट्स 2 क च्या अध्यक्षा, कार्यवाह व विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.
श्री.विश्वास चितळे, प्रियांका भगत, डॉ.अशा गाजी , मंजिरी गद्रे, दिपाली सिंहासने, अनघा चितळे, स्मिता चितळे यांनी फ्लॅग दाखवून स्पर्धेचा प्रारंभ केला.चितळे डेअरीचे व कर्मचारी यांचेही मोलाचे सहकार्य लाभले . भिलवडी पोलीस ठाण्याचे पावसे साहेब आणि त्यांच्या सहकार्यनीही रोडवर ट्रॅफिक साठी उत्तम नियोजन केले.
भक्ती चितळे आणि सहेलीच्या पदाधिकाऱ्यांनी या स्पर्धेचे नियोजन एखाद्या चित्रपट दिग्दर्शकालाही लाजवेल अशा शिस्तबद्ध पद्धतीने केले होते. मार्गावर सहभागी महिलांसाठी पाणी, गोळ्या, चॉकलेट्स आणि खबरदारी म्हणून रुग्णवाहिकेची चोख व्यवस्था करण्यात आली होती. केवळ व्यायाम म्हणून नव्हे, तर स्वतःसाठी वेळ काढून आनंदाचे सेलिब्रेशन करण्यासाठी महिलांनी या उपक्रमाला मोठी पसंती दिली. या यशस्वी आयोजनासाठी जायंट्स ग्रुपच्या सदस्यांनी आणि ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले असून ‘फिट रहा थेट रहा’ असा संदेश या माध्यमातून देण्यात आला.