
दर्पण न्यूज पलूस/ भिलवडी:- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडी आणि ग्रामपंचायत भिलवडी यांचे संयुक्त विद्यमाने 9 ऑगस्ट क्रांती दिन साजरा करण्यात आला.
यावेळी भिलवडी येथील स्वातंत्र्यसैनिकांच्या कोन शिलेला वाचनालयाचे संचालक मकरंद चितळे आणि सरपंच सौभाग्यवती स्वप्नाली रांजणे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
प्रारंभी वाचनालयाचे कार्यवाह सुभाष कवडे यांनी क्रांती दिनाचे महत्त्व सांगून या कोनशीलेचा इतिहास सांगितला यावेळी महावीर वठारे गुरुजी यांनीही मनोगत व्यक्त केले . वाचनालयाचे सर्व संचालक ग्रामपंचायतीचे पदाधिकारी ग्रामस्थ व वाचक बहुसंख्येने उपस्थित होते.
