ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कासारवाङा येथे विद्युत तारेला स्पर्श लागून माजी सरपंचांच्या मुलाचा मूत्यू

कोल्हापूरःअनिल पाटील

दसर्‍यानिमित्त घराची साफसफाई करत अविद्युतर तारेचा स्पर्श होवून एका यूवकाचा मूत्यू झाला. श्रीराज अशोक वारके ( वय 28) रा.कासारवाङा ( .ता.राधानगरी ) असे त्याचे नाव आहे. माजी सरपंच अशोक वारके यांचा तो मूलगा आहे.या घटनेमूळे गावावर शोककाळा पसरली आहे. आज सकाळी तो दसर्‍याच्या सणानिमित्त आपल्या घराची साफसफाई करत असताना त्याचा विद्यूततारेला स्पर्श झाल्याने तो खाली कोसळला.त्यानंतर त्याला नातेवाईकांनी पूढील उपचारासाठी खासगी हाॅस्पीटलला घेवून जात आसतानाचा त्याचा मूत्यू झाला. सोळांकूर येथील ग्रामीण रूग्णालयात पोष्टमार्टम केल्यानंतर त्यांचा मूतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. राधानगरी पोलिसांत या घटनेची नोंद झाली असून पोलिस निरीक्षक ए.एस.कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पो. काॅ पारखे करत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close