व्यापारसांगली

भिलवडी येथे हॉटेल ग्रीन पार्क लाॅजिंग चे थाटात उद्घाटन

उद्योगपती गिरीश चितळे, उद्योगपती मकरंद चितळे यांची उपस्थिती

भिलवडी /दर्पण वृत्त :
सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्याती भिलवड येथील हॉटेल ग्रीन पार्क लाॅजिंग चा उद्घाटन समारंभ थाटात आणि शानदार सोहळ्यात संपन्न झाला. उद्योगपती गिरीश चितळे, उद्योगपती मकरंद चितळे यांच्या हस्ते फीत कापून शुभारंभ करण्यात आला.

यावेळी बोलताना गिरीश चितळे म्हणाले की,गुणवत्तेशी तडजोड न करता सातत्याने व प्रामाणिकपणे केलेला उद्योग व्यवसाय नावारूपास येतो.रमेश पाटील यांनी हॉटेल ग्रीनपार्कने अन्नपदार्थांची चव,सेवा व व्यस्थापन क्षेत्रात गुणवत्ता टिकवून ठेवली आहे.असे बोलून हॉटेल ग्रीन पार्क चर्या भावी वाटचालीस शभेच्छा दिल्या.
रमेश पाटील यांनी हॉटेल ग्रीन पार्क च्या प्रवसा विषयीचा आढावा आपल्या मनोगतातून मांडत भविष्यात ग्रामीण भागात या व्यवसायात नाविन्यता आणण्याचे प्रयत्न सातत्याने करणार असल्याचे सांगितले.
यावेळी गोपुज साखर कारखान्याच्या अध्यक्षा सौ.अपर्णा संग्रामसिंह देशमुख,पलूस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष मोहन पाटील,क्रांती कारखान्या चे संचालक महावीर चौगुले,दक्षिण भाग सोसायटीचे चेअमन बाळासाहेब मोहिते,सतीश पाटील,दिपक पाटील ,दत्ता उतळे,सौ.क्रांती पाटील,ऋतिक पाटील आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक व स्वागत रमेश पाटील यांनी केले.  सूत्रसंचालन शरद जाधव यांनी केले.  संजय पाटील यांनी आभार मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close