ताज्या घडामोडी

जि. प. सदस्यपद रद्द की अब्रूनुकसानीचा दावा?

भिलवडी जिल्हा परिषद गटात जोरदार चर्चा

भिलवडी/मुख्य संपादक अभिजीत रांजणे :: सांगली विश्रामबाग पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या बांधकाम व्यावसायिकावर बंदुकीचा धाक दाखवून अपहरण, खंडणी वसूल गुन्हा प्रकरणातील जिल्हा परिषद सदस्यांचं पद  रद्द होणार ? नाहीतर दाखल करण्यात आलेली तक्रार चुकीची आहे म्हणून संबंधितावर अब्रूनुकसानीचा दावा केला जाणार?  अशी जोरदार चर्चा  भिलवडी जिल्हा परिषद गटात सुरू आहे. 

गेल्या आठवड्यापासून भिलवडी जिल्हा परिषद गटातील नागरिकांना मोठा प्रश्न भेडसावत आहे. तो म्हणजे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उसनवारी पोटी म्हणत  15 लाखांची रक्कम एखाद्या माणसाला देणं, आणि निवडणूक संपली, संबंधित पदाचा कार्यकाल संपत आला की पुन्हा दिलेली रक्कम परत मागण्याची ही पद्धत कसली?  तर घेणार्‍या व्यक्तीने वेळ काढूपणा करायचा, दगाबजी करायची आणि  रक्कम हाडपायची ही पद्धत कसली?  या गोष्टीला दुजोरा देऊन चालणार नाही. तर हा वैयक्तीक दोघांचा प्रश्न असेलही, दोघे एकत्र येऊन प्रश्न सोडवतील ही. परंतु, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत असलेल्या एका संदेशामधून जिल्हा परिषद सदस्य यांचे गुणगान दिसत आहे. तर मग गुणगान गाणाार्‍यांनी गुन्हा दाखल केलेल्यावर गुन्हा खोटा आणि खोडसाळ आहे  म्हणून काय केले. संबंधितांवर अब्रूनुकसानीचा दावा दाखल का केला नाही.

खरेच बंदुकीचा धाक दाखवून अपहरण करण्याचा प्रयत्न करणार्‍या जिल्हा परिषद सदस्यांचं सदस्य पद रद्द करण्याठी विरोधकांनी काय केले. हा मुद्दा उपस्थित होत आहे.

खरे पाहता वरील न्यायालयीन प्रक्रिया आहे. न्याय देवता न्याय देईलच. पण, कोणी ही कुणावरही असे गुन्हे दाखल करून तडजोड करतील.  अब्रू, प्रतिष्ठा  वाचवण्यासाठी गरीब आणि श्रीमंत घराण्यातील लोकांनी  गप्पच बसायचे का?

नाही तर खरोखरच बंदूक वैगरेचा धाक दाखवत एखाद्याला भीती दाखवून दबदबा निर्माण करायचा. या गोष्टीलाही वाचा फुटली पाहिजे.

लोकशाही आणि घटनेचा आदर करत प्रत्येकाने समजून घेत देणेघेणेचा विषय मिटवला पाहिजे. घरच्या लोकांना होणारा मनस्ताप वाचेल.  गावगवांत होणारी खरीखोटी चर्चा होणार नाही.

प्रत्येक गावात होणारी दंडूकशाही आणि फसवणूक थांबविण्याठी पोलिसांची मदत घेतली पाहिजे, अशी चर्चा  भिलवडी जिल्हा परिषद गटातील लोकांत होत आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close