ताज्या घडामोडी

सांगली : तालुकास्तरावरील स्थापित ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँकेचा गरजू रूग्णांनी लाभ घ्यावा: जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे

    सांगली/ मुख्य संपादक अभिजीत रांजणे  : वृध्द, दम्याचे किंवा हृदय रोगाचे रूग्ण अशा काही कोविड रूग्णांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सुध्दा ऑक्सिजनची गरज काही प्रमाणात लागत राहते. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन हवेतील ऑक्सिजन घेवून त्याचे शुध्दीकरण करून रूग्णांना ऑक्सिजन उपलब्ध करून देत असल्यामुळे त्यास सिलेंडरची गरज भासत नाही. त्यामुळे अशा मशिन हॉस्पीटल अथवा घरगुती वापर या दोन्ही ठिकाणी वापरल्या जात आहेत. या मशिन शासन स्तरावरून आणि दानशूर व्यक्तींमार्फत सीएसआर मार्फत उपलब्ध होत आहेत. त्या तालुकास्तरावर एकत्रित साठा पध्दतीने ठेवून गरजू रूग्णांना मोफत वापरण्यास देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार प्रत्येक तालुकास्तरावर एक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँक तयार करण्यात आली आहे. याचा गरजू रूग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close