सांगली

“पालकांची लूट करणाऱ्या शिक्षणमाफियांच्यावर कारवाई करा “

महाराष्ट्र कामगार - कर्मचारी संघ सांगली जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांची शिक्षणाधिकारी यांच्याकडे मागणी

सांगली : मोलमजूर व मध्यमवर्गीय विद्यार्थी आणि पालकांची लूट करणाऱ्या शिक्षणमाफियांच्यावर कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी अखिल महाराष्ट्र कामगार – कर्मचारी संघ सांगली जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी शिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ सांगली जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात असे म्हटले की सांगली शहर त्याचबरोबर जिल्ह्यातील,गरीब मजूर वर्ग आपल्यावर आलेले दिवस हे आपल्या मुलांच्यावर येऊ नये,तो मोठा अधिकारी व्हावा म्हणून अवोरात्र काबडकष्ट करून मुलांना खडतर परिस्थितीत सुध्दा शिक्षण देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असतात. या कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांची एक वेळची चूल पेटने मुश्किल झाले आहे. कसाबसा आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत आहेत.
अशा नाजूक गंभीर परिस्थितीत बरेचसे शिक्षण संस्थापक हे गोरगरीब मोलमजूरी तसेच मध्यमवर्गीय पालकांची तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात लुट करीत आहेत.सद्या देशात तसेच राज्य त्याचबरोबर आपल्या सांगली जिल्ह्यात कोरोना विषाणू ची आपत्ती ने सर्वच घटकातील पालकवर्गांना त्रासदायक करून सोडले आहे. अशा गंभीर परिस्थितीत मा.शिक्षण मंत्री सो यांनी शैक्षणिक संस्थांना,विद्यार्थी व पालकांच्याकडून कोणत्याही प्रकारे सक्तीने शैक्षणिक फी अथवा डोनेशन घेऊ नये असे सक्त सुचना दिलेल्या असतानाही शैक्षणिक संस्थांच्याकडून मोठ्या रक्कमेची मागणी होत आहे. प्राथमिक मधून माध्यमिक मध्ये प्रवेश करताना,गोरगरीब मोलमजूर तसेच आर्थिक दुर्बलघटकातील विद्यार्थ्यांना फी दिल्याशिवाय पुढील शैक्षणिक वर्गात प्रवेश देत नाहीत. सदर शाळेचे मुख्यध्यापक हे विद्यार्थी व पालकांना सांगतात की,तुम्ही शाळेच्या संस्थापक साहेबांना भेटा व आपला प्रवेश निश्चित करा.परंतु बरेचसे शैक्षणिक संस्थांना शासकीय अनुदान आहे.त्यांच्या शैक्षणिक संस्थेतील शिक्षक व शिक्षेत्तर स्टाफ यांचा पगार शासनाच्या तिजोरीतूनच केला जात आहे.तसेच गेले दोन वर्षापासून कोरोना गंभीर विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे केंद्र व राज्य शासनाने शाळा बंद करून आॕनलाईन शिक्षण देण्यास सुरवात केली आहे. परंतु ते शिक्षण कुचकामी ठरत आहे.विद्यार्थ्यांना म्हणावे तेवढे उपयोगी पडत नसल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाण शैक्षणिक दृष्ट्या नुकसान झालेले आहे. परंतु प्रत्येक वर्षी शाळा सुरू होण्यापूर्वी मोठी आमिष दाखवून पालकांची व विद्यार्थ्यांची दिशाभूल करून अव्वाच्या सव्वा रक्कमेची वसुली केली जात आहे.तसेच शासनाने गोरगरीब मोलमजूर दुर्बलघटकातील लोकांच्या सर्व शैक्षणिक संस्थेत राखीव कोटा ठेवला हा फक्त कागदेपत्रीच आहे,असे दिसून येत आहे. सर्व शैक्षणिक संस्थापकांनी शिक्षणाचा बाजार मांडलेला आहे. खुलेआम शिक्षणमाफियांकडून मोठ्या प्रमाणात लूट केली जात आहे. जिल्ह्यातील सर्वच शैक्षणिक संस्थांना कोणत्याही प्रकारचे आर्थिक मागणी विद्यार्थी तसेच पालकांच्याकडून करू नये असे लेखी आदेश देण्यात यावेत. तरीही लूट करीत असतील तर अशा प्रकारे लूट करत असणाऱ्या शैक्षणिक संस्थापक व संचालक मंडळाच्या सर्व सदस्याच्यांवर कायदेशीर कारवाई करावी.तसेच अशा शैक्षणिक संस्थेची मान्यता रद्द करावी.सदरचा शैक्षणिक संस्था शासनाने चालवावेत. अन्यथा कायदेशीर हक्काचे शिक्षण मिळविण्यासाठी,आद.ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात लोकशाही मार्गाने लढा उभा करावा लागेल.असे अखिल महाराष्ट्र कामगार – कर्मचारी संघ,महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हाध्यक्ष मा.संजय कांबळे यांनी,मा.जिल्हा शिक्षण अधिकारी यांना निवेदन द्वारे इशारा दिलेला आहे.


त्यावेळी पत्रकार संग्राम मोरे,पत्रकार संजय कांबळे(दिपंकर),युवराज कांबळे,आनंदा गाडे,उमेश लाडगे,विक्रांत सादरे, राजू सय्यद,विक्रांत गायकवाड,चंद्रकांत कांबळे,अतिश कांबळे यांच्या बरोबरच पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close