ताज्या घडामोडी

सांगली जिल्हा परिषदेत लसीकरण मदत कक्ष स्थापन

लसीकरणाबाबत माहिती मिळणार: मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी

 सांगली, / मुख्य संपादक अभिजीत रांजणे  : सध्या सांगली जिल्ह्यातील सुरु असलेल्या कोविड-19 लसीकरण कार्यक्रमात सुसूत्रता आणण्यासाठी, लस उपलब्ध माहिती, पात्र लाभार्थी माहिती व शासनाच्या वेळोवेळी येणाऱ्या नविन मार्गदर्शक सूचना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्हा परिषद आरोग्य विभागामध्ये लसीकरण मदत कक्ष स्थापन केला आहे. हा कक्ष सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहील. या कक्षाचा दूरध्वनी क्रमांक  0233-2373032, 2374462 असून ई-मेल covidvac.zpsangli@gmail.com हा आहे. अशी माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील यांनी दिली.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close