आरोग्यताज्या घडामोडीसांगली

भिलवडी येथे 25 बेडचे ग्रामपंचायत भिलवडी कोविड -19 केअर सेंटरचे शानदार उद्घाटन

भिलवडी ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्राचा पुढाकार : भरीव मदत देण्याची चितळे उद्योग, ऋषिकेश लाड यांची घोषणा

भिलवडी : मुख्य संपादक अभिजीत रांजणे ::: सांगली जिल्ह्यात प्रथमच ग्रामीण भागात भिलवडी  ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्र भिलवडी यांच्या संयोगातून  25 बेडचे ग्रामपंचायत भिलवडी कोविड- 19 केअर सेंटरचे उद्घाटन आज सोमवार दिनांक 17 रोजी सकाळी करण्यात आले. या उद्घाटनप्रसंगी चितळे उद्योग समूहाचे उद्योजक गिरीष चितळे,युवा नेते ऋषिकेश लाड, डॉ बाळासाहेब चोपडे, माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम दादा पाटील, सरपंच सुनिता महिंद पाटील, उपसरपंच पृथ्वीराज पाटील, भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ विश्वास धेंडे,  भिलवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास कोडग आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी युवा नेते ऋषिकेश लाड यांनी भारती मेडिकलच्या माध्यमातून ग्रामपंचायत भिलवडी  कोविड -१९ सेंटरला लागणारे औषधे आणि इतर  साहित्य देण्याचे आश्वासन दिले.

चितळे उद्योग समूहाचे उद्योजक गिरीष चितळे यांनी चितळे उद्योग समूहाच्या माध्यमातून भरीव मदत करण्याचे आश्वासन देऊन प्रत्येकांनी कोरोनाविषयी काळजी घ्यावी. भिलवडी गावत सुरू केलेल्या कोविड सेंटरचा गरजूंना लाभ होणार आहे, असे सांगितले.

डॉ बाळासाहेब चोपडे, डॉ विश्वास धेंडे यांनी लोकांनी कोरोना विषयी सतर्क राहण्याचे आवाहन केले. डॉ धेंडे यांनी कोविड सेंटरविषयी सविस्तर माहिती दिली.

यावेळी भिलवडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विशाल जगताप, माजी उपसरपंच चंद्रकांत पाटील, श्रीकांत गायकवाड, दक्षिण भाग सोसायटी चेअरमन बाळासाहेब मोहिते,  व्यापारी संघटनेचे कार्याध्यक्ष जावेद तांबोळी,  पाटील डेअरीचे उद्योजक राजू पाटील,  गौसमहंमद लांडगे, सेकंडरी स्कूलच्या मुख्याध्यापिका, खाजगी प्राथमिकचे मुख्याध्यापक किणीकर,  ग्रामपंचायत सदस्य,  ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

यावेळी क्रूष्णा फौंडेशनने 5 हजार रुपयांची कोविड सेंटरला देणगी दिली.

उपसरपंच पृथ्वीराज पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कमी कालावधीत सर्व सुविधाउक्त ग्रामपंचायत भिलवडी  कोविड- 19 केअर सेंटर उभारले आहे. नक्कीच या कोविड सेंटरचा लोकांना मोफत लाभ होणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close