ताज्या घडामोडी

चोपडवाडीत मगरीच्या हल्ल्यात महिला जखमी

नदी काठावरील गावात भीतीचे वातावरण

भिलवडी :  सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील चोपडवाडीच्या क्रूष्णा  नदीकाठवर नम्रता मारूती मोरे (30) ही कपडे धुण्यासाठी गेली असता पाण्यातून अचानक मगरीने हल्ला केल्याने जखमी झाली.

चोपडवाडी येथील नम्रता मोरे या महिला नेहमीप्रमाने आज शुक्रवारी सकाळी नदीकाठावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. शेजारी इतर महिलाही होत्या. नम्रता मोरे या कपडे धुताना अचानक पाण्यातून मगरीने हल्ला केला. यामध्ये नम्रता यांनी केले प्रसंगावधान राखून मगरीने हातावर केलेला हल्ला जोरात झिडकारून किनारी धाव घेतली. शेजारील महिलांही आरडाओरडा केल्यानंतर मगर पाण्यात गेली.   नम्रता मोरे यांना भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. यात त्यांच्या हाताला टाके घालावे लागले. भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ काळे यांनी त्यांच्यावर उपचार केले. त्यांना कर्मचारी यांनी मदत केली. पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close