ताज्या घडामोडी

सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ विश्वजीत कदम यांच्या आदेशानंतर तात्काळ भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रात मंडप उभारणी

गैरसोय दूर केल्याने नागरिकांत समाधान : मंञी विश्वजीत कदम यांचे सर्वञ कौतुक

भिलवडी : सहकार व कृषी राज्य मंत्री डॉ. विश्वजीत कदम साहेब यांनी अचानक भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली होती. त्यावेळी त्यांना लोकांना भर उन्हात बसून लस घेण्यास थांबावे लागत असल्याचे दिसले. त्यांच्या आदेशानंतर लगेचच भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर मंडप उभारण्यात आला. ही गैरसोय दूर झाल्याने ग्रामस्थांनकडून समाधान व्यक्त होत आहे.

या अचानक भेटनंतर मंत्री  डॉ विश्वजीत कदम यांनी लोकांची विचारपूस केली. कोरोनाविषयी  खबरदारी घ्यावी, प्रत्येकांनी लस घ्यावी इतरांनाही  सांगावे ,असे आवाहन केले.

मंञी विश्वजीत कदम यांच्या आदेशानंतर तात्काळ भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रात लोकांना सावलीसाठी मंडप उभारण्यात आला. याबाबत लोकांनी समाधान व्यक्त करून त्यांचे कौतुकही केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close