सांगली

भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राने लोकांची गैरसोय दूर करावी: सहकार मंत्री डॉ विश्वजीत कदम यांचे आदेश

भिलवडी :  पलूस तालुक्यातील भिलवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास ना. डॉ विश्वजीत कदमसाहेब यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात होत असलेली लोकांची गैरसोय दूर करावी, असे आदेश ही सहकार मंत्री डॉ विश्वजीत कदम यांनी यावेळी दिले.

सहकार मंत्री डॉ विश्वजीत कदम यांनी कोरोना लसीकरणाची माहिती घेतली आणि  उपस्थित नागरिकांना भेटून लसीकरणाबद्दल माहिती देत लोकांनी वेळेत लस घ्यावी, असे आवाहन केले.
या वेळी लस घेण्यास येणाऱ्या लोकांना उन्हात बसावे लागत असल्याचे त्यांना दिसले असता त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना तात्काळ मंडप घालण्याचा आदेश दिला. लोकांना कोणत्याही समस्येला तोंड द्यावे लागूू नये  याची संबंधित अधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी,  असे ही मंञी कदम यांनी सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close