ताज्या घडामोडी

बचत गटांना सहकार्य करणार : उपसरपंच पृथ्वीराज पाटील

राजमाता व कृष्णामाई महिला ग्रामसंघ यांच्यवतीने भिलवडीच्या नवनियुक्त सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार 

भिलवडी : भिलवडी  राजमाता व कृष्णामाई महिला ग्रामसंघ यांच्यवतीने भिलवडीचे नवनियुक्त सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार
दि. 20-2-2021 रोजी भिलवडी ता.पलूस जि.सांगली या ठिकाणी करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना श्रीकांत जंगम यांनी केली .महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, महिला स्वयहाय्यता समुह व ग्रामसंघाची ओळख व माहिती नवनियुक्त सदस्य यांना करुन देण्यात आली. सरपंच सौ . सविता महिंद (पाटील) यांचा सत्कार –संगिता चिंचवडे यांनी केला.उपसरपंच पृथ्वीराज पाटील यांचा सत्कार- श्रीकांत जंगम यांनी केला यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य यांना श्रीफ़ळ व गुलाब पुष्प देण्यात आले. ग्रामसंघाच्या सचिव सायली चौगुले यांनी मनोगत मध्ये ग्रामसंघास खोली उपलब्ध करुन देणे, 14 वित्त आयोग मधुन महिला प्रशिक्षण घेणे,व ग्रामसंघास निधी उपलब्ध करुन देणे, आठवडी बाजारात महिलांना स्वतंत्र बैठक व्यवस्था करावी. ग्रामपंचायत मार्फ़त विविध कामे ही बचत गटातील महिलांना संधी देण्यात यावी. इत्यादी गोष्टीची मागणी नवनियुक्त सरपंच व उपसरपंच यांच्या कडे केली. ग्रामपंचायतची पहिली मासिक मिटीग मध्ये सर्व निर्णय मान्य केले जातील व महिला समक्षीकरण करणे करिता ग्रामपंचायत पुर्णपणे सहकार्य करु,असे आश्वसन उपसरपंच पृथ्वीराज पाटील यांनी दिले.

या कार्यक्रमाचे नियोजन संदेश पिसे, राजमाता व कृष्णामाई ग्रामसंघाचे सर्व पदाधिकारी, भिलवडी गावातील सर्व समुहातील महिलानी केले. सूत्रसंचालन दिपाली पाटील यांनी केले. आभार उषा पाटील यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close