महाराष्ट्रसांगली

पोलिस, आर्मी, नेव्ही भरतीबाबत 25 फेब्रुवारीला ऑनलाईन मार्गदर्शन सेमिनार :  ज. बा. करीम

सांगली : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली मार्फत नोकरी व स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांसाठी दि. 25 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत पोलीस, आर्मी, नेव्ही इत्यादी भरतीबाबत ऑनलाईन मार्गदर्शन सेमिनार आयोजित करण्यात आला आहे. इच्छुक युवक व युवतींनी http://bit.ly2ZgdXPh या लिंकवर आपली नोंदणी करावी व https://meet.google.com/dhf-qppy-dqe या लिंकवर विहीत वेळेत सेमिनारमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त ज. बा. करीम यांनी केले आहे.

            या सेमिनारमध्ये यंग प्रोफेशनल मॉडेल करिअर सेंटर ठाणे चे आशुतोष साळी हे प्रमुख मागदर्शक असून सहायक आयुक्त ज. बा. करीम तसेच रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी आ. बा. तांबोळी यांचा सहभाग असणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close