महाराष्ट्रसांगली

गरीबांचा आधारवड सहकार मंत्री डॉ. विश्वजीत कदम

एका गरीब कुटुंबाच्या हाँस्पिटल बिल माफीने पतंगराव कदम साहेब यांच्या आठवणींना उजाळा

सांगली/भिलवडी : सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील भिलवडी ग्रामपंचायत कर्मचारी रंजना सहदेव कांबळे या भारती हाँस्पिटल सांगली येथे उपचार घेत होत्या, पैसे नसल्याने त्या डिस्चार्ज घेऊ शकत नसल्याची माहिती सहकार मंत्री डॉ विश्वजीत कदम यांना सांगण्यात आली. सहकार मंत्री विश्वजित कदम यांनी दखल  घेऊन  तात्काळ सर्वच बिल माफ केले. यामुळे  तळागाळातील लोकांना नेहमी मदत करणारे कै, मंञी पतंगराव कदम साहेब यांच्या आठवणींना उजाळा मिळाला. कै. पतंगराव कदम साहेब यांच्या पावलांवर पाऊल मंञी विश्वजीत कदम टाकत आहेत,अशा जोरदार चर्चा भिलवडी परिसर  व सांगली जिल्हात होत आहे.

सहकार मंत्री डॉ विश्वजीत कदम यांनी 2019 च्या सुमारास महापूर काळात पायाला दुखापत झाली तरी सामान्य माणसाला दोन घास दिले. कोणत्याही लोकांना उपाशीपोटी त्यांनी ठेवले नाही. याची जाणीव प्रत्येकाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून भारती हॉस्पीटलमध्ये भिलवडी ग्रामपंचायत कर्मचारी रंजना सहदेव कांबळे या उपचार घेत होत्या. उपचारासाठी पैशाची चणचण भासू नये म्हणून पंचशीलनगर येथील नागरिकांनी आणि भिलवडी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी भरीव मदत केली.

गेल्या काही    दिवसांपासून उपचार घेत असलेल्या रंजना कांबळे यांना डिस्चार्ज देण्यात आला. परंतु भारती हाँस्पिटलचे बिल भरण्यासाठी पैसे नसल्याने त्यांना डिस्चार्ज घेता येत नसल्याची माहिती सहकार मंत्री डॉ विश्वजीत कदम यांना देण्यात आली.  या घटनेनंतर तात्काळ रुग्णालयाचे  बिल माफ करून त्यांनी सामान्य माणसाला न्याय दिला आहे. यामुळे त्यांना गोरगरिबांचा आधारवड म्हणावे लागेल. या भूमिकेमुळे भिलवडी परिसरातील नागरिकांनी कै. मंञी पतंगराव कदम साहेब यांच्या आठवणींना उजाळा दिला. सहकार मंत्री डॉ विश्वजीत कदम हे  पतंगराव कदम साहेब यांचा वारसा जपत आहेत.

गरीबांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत असलेले सहकार मंत्री डॉ विश्वजीत कदम यांना कदापि लोक विसरणार नाहीत. नक्कीच त्यांच्या कार्याला लोकांचा आशिर्वाद असणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close