सांगली

“वाचन कट्टा”ने वाचन चळवळ सशक्त होणार : उद्योजक गिरीश चितळे

भिलवडी वाचनालयाच्या वाचन कट्टा उपक्रमास प्रतिसाद

भिलवडी : वाचन कट्टा या उपक्रमातून वाचन चळवळ सशक्त होईल असे प्रतिपादन भिलवडी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष उद्योजक गिरीश चितळे यांनी केले.
भिलवडी ता.पलूस येथील सार्वजनिक वाचनालयात आयोजित वाचन कट्ट्यावर माझे आई विषयीचे वाचन या विषयावर चर्चा रंगल्या. गिरीश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम राबविण्यात आला.वाचनालयाचे माजी अध्यक्ष
स्वर्गिय काकासाहेब चितळे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.दर महिन्यात सहभागी वाचकांना एक विषय दिला जातो. त्या विषयाशी संदर्भित पुस्तकांचे वाचन करून पुढील महिन्यातील वाचन कट्ट्यावर सारांश रुपी विचार सादर करावयाचे असे या उपक्रमाचे स्वरूप आहे.त्यास वाचक व सभासद वर्गाकडून उस्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे.
गिरीश चितळे यांनी यावेळी वाचनालयात ग्रंथ भेट दिली.प्रारंभी गझलकार ईलाही जमादार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
सुभाष कवडे यांनी सानेगुरुजीं आई,मॅक्झीम गार्की यांच्या आई बद्दल आठवणी सांगितल्या.तसेच आई विषयीच्या काही रचनाही सादर केल्या.
लेखक संदिप नाझरे यांनी “लळा”ही कविता सादर केली.शरद जाधव यांनी मदत तेरेसा यांच्या आईने केलेल्या संस्कराविषयी विविध गोष्टींचे कथन केले.निवृत्त न्यायाधीश जगन्नाथ माळी यांनी घराघरातील मुलांनी आई समजून घेतल्यास वृद्धाश्रमाची गरज भासणार नाही असे मत मांडले.भू.ना.मगदूम म्हणाले की,जीवनात आईचं स्थान अमर्याद आहे,ज्या घरात संस्कारक्षम आई आहे तिथे सर्व आहे.
कु.आरती बाबर,डी.आर.कदम,संजय पाटील,जी.जी.पाटील,उत्तम मोकाशी,रमेश चोपडे,हणमंत डिसले,सुनिल भोसले,दिपक गुरव आदींनी मनोगत व्यक्त केले.

 

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close