सांगली

भिलवडीकरांना सरपंच पद गौण, विकास महत्त्वाचा ..!

नव्या ग्रामपंचायत सदस्यांच्या कार्यावर प्रत्येक वॉर्डात असणार लक्ष?

भिलवडी /पलूस : सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील भिलवडी ग्रामपंचायत निवडणूक झाली. नवीन सदस्य निवडून आले, सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले खरे, पण भिलवडीकरांना सरपंच पद गौण असून विकास महत्त्वाचा आहे, अशा प्रतिक्रिया अनेक वार्डात उमटत आहेत.

भिलवडी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या खंडोबा पॅनल आणि परिवर्तन पॅनलने जाहीरनामे प्रसिद्ध केले, तशा जाहीरनाम्याच्या प्रती लोकांच्या घराघरात पोहोचही केल्या. यामध्ये दोन्ही पक्षानी एकमेकांवर आरोप करत उन्हेधुणेही काढले. काहींना पचले काहींना नाही. काहींनी दोन्ही बाजूंनी चाटून पुसून, हाथ धुऊन घेतले. काहींनी तर मेलेल्या मढ्यावरचं खाण्यापलीकडचं केले. काहींनी पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे भासवून राञी 1 ते 2 वाजता झोपेतच गठ्ठेच्या गठ्ठे घेतले, काहींनी काय काय केले सांगण्या पलिकडचे आहे. माञ, जो खराच सच्चा राबराबला त्याला सेल्फीच्या जमान्यात कोपरखळी बसल्या आणि बसत आहेत.

ग्रामपंचायत निवडणूक म्हटले की असेच असते का? तर होय होय आणि होयच म्हणवे लागेल. पण आत्ता माञ लोकांना बदल पाहिजे आणि पाहिजेच. सत्ता बदल झाली, लोकांनी 13/4ची विजयी माळ काँग्रेस प्रणित खंडोबा पॅनलच्या गळ्यात घातली. माळ गळ्यात पडली खरी, पण तशा लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. साहजिकच लोकांनी भिलवडी गावच्या विकासासाठी सत्ताधाऱ्यांना धडा शिकविला असेल, त्यांनी कामे केली नाहीत असे म्हणता येणार नाही, माञ,  लोकांना विकासाबाबत समाधान मिळाले  नसेल.

खंडोबा पॅनलने सत्ता काबीज केली आहे. गावात अनेक समस्या आहेत आणि येतही जाणार आहेत. या प्रत्येक गोष्टीचा विचार करून गावातील प्रत्येक वॉर्डातील समस्या सोडविण्यासाठी नवनिर्वाचित सदस्यांनी जोमाने प्रयत्न केला पाहिजे. लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गावाला नव्या संकल्पना, शुध्द पाणी आणि बरच काही पाहिजे. भिलवडीकरांना सरपंंच पद गौण असून विकास महत्त्वाचा आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close