महाराष्ट्रसांगली

भिलवडी येथे सुभाष कवडे यांच्या “जांभळमाया” पुस्तकाचे प्रकाशन

भिलवडी : “जांभळमाया” या सुभाष कवडे लिखित आत्मकथनात्मक पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सार्वजनिक वाचनालय,भिलवडी येथे संपन्न झाला.यावेळी ते बोलत होते.सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या हस्ते व उद्योगपती गिरीश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली व वैजनाथ महाजन व डॉ.प्रदीप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
यावेळी बोलताना प्रा. वैजनाथ महाजन म्हणाले की,मराठी साहित्यात शिक्षक साहित्यिकांनी लेखनाची मोठी परंपरा निर्माण केली. वि. स.खांडेकरांच्या लेखनावर शिक्षक स्वार झाला आहे. सुभाष कवडे हे साहित्य क्षेत्रातील आनंदयात्री अाहेत.त्याज्य आहे त्याकडे न डोकावता जे समाजासाठी
स्विकायऀ आहे तेच सकारात्मक रित्या मांडतात.वाचकाला अंतर्मुख व अस्वस्थ करणारे साहित्य सर्वाधिक गुणात्मक असते,विचारांचा वसा घेऊन व्रतस्थपणे वास्तवाला भिडल्याशिवाय सृजनशील साहित्याची निर्मिती होत नाही असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत प्रा.वैजनाथ महाजन यांनी केले.
पुस्तक प्रकाशित होणं हा आत्मिक आनंदाचा भाग आहे असं प्रांजळ मत सुभाष कवडे यांनी व्यक्त केले.
उद्योजक गिरीष चितळे म्हणाले की, जांभळमाया हे पुस्तक आत्मिक समाधा नाबरोबर अनुभव विश्व ही जागृत करते.
सुभाष कवडे यांच्या संघर्षाचे सार म्हणजे जांभळमाया असं प्रतिपादन कवी प्रदीप पाटील यांनी केले.
अमरसिंह देशमुख यांनी माणदेशातील तत्कालीन परिस्थितीचे व संघर्षाचे चित्रण लेखणात उतरल्याचे नमूद केले,त्याच सोबत “व्यक्त व्हा व अधिकाधिक लिहतं व्हा” असा संदेश त्यांनी आपल्या भाषणात दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत विठ्ठल मोहिते यांनी, सूत्रसंचालन शरद जाधव यांनी तर अाभार डी.आर.कदम यांनी मानले.यावेळी प्रा.संजय ठिगळे,शाहीर पाटील,जी.जी.पाटील, ए.के.चौगुले,भू ना.मगदूम,रमेश पाटील, पुरुषोत्तम जोशी,महावीर वठारे,हणमंत डिसले आदी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close