कृषीसांगली

राजारामबापू पाटील सहकारी दूध संघातर्फे कस्टर्ड बीएमसी अंतर्गत कृष्णाकाठ शेतीमाल संस्थेमध्ये दूध विभाग सुरू

पलूस : राजारामबापू पाटील सहकारी दूध संघ मर्यादित इस्लामपूर संघातर्फे कस्टर्ड बीएमसी अंतर्गत दुधाचा नवीन प्लांट कृष्णाकाठ शेतीमाल प्रक्रिया व साठवणूक संस्था या संस्थेमध्ये दूध विभाग सुरू करण्यात आला.

यावेळी राजारामबापू दूध संघाचे चेअरमन विनायक (आण्णा) पाटील व कृष्णाकाठ उद्योगसमूहाचे शिल्पकार जे के (बापू) जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले, यावेळी मानसिंग बँकेचे चेअरमन युवा नेते सुधीर (भैय्या) जाधव, कै. सौ. मीनाक्षीदेवी जे के बापू जाधव नॉन अग्री को ऑप क्रेडिट सोसायटीचे संस्थापक क्रांतीकुमार जाधव, कृष्णाकाठ दूध डेअरीचे चेअरमन संदीप पाटील, पलुस तालुका मार्केट कमिटीचे सभापती सुनील नलवडे, प्रमुख उपस्थित होते,

यावेळी राजारामबापू दूध संघाचे चेअरमन यांनी पहिल्यांदा दूध संघ फक्त वाळवा तालुक्यापुरता बोनस जाहीर करत, असे पण यावेळी कृष्णाकाठ उद्योग समूहाचे नेते जे. के. ( बापू ) जाधव यांच्या आग्रहास्तव आपण दुधोंडी यासह परिसारामधील गावांना येणाऱ्या भविष्यकाळात बोनस फक्त संस्था असतील त्या दूध डेअरीना बोनस दिला जाईल, असे मत त्यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले. तसेच जे के (बापू) जाधव यांनी शुन्यातून आपल्या संस्थांचे जाळे निर्माण केले आहे, त्या संस्थाना टिकवण्याचे काम बापू व त्यांच्या परिवाराने अतिशय चांगल्या पद्धतीने केले आहे, असे मत त्यांनी आपल्या व्यक्त केले.
यावेळी दुधोंडी उपसरपंच रवींद्र नलवडे, ग्रामपंचायत सदस्य प्रताप जाधव,संदीप सावंत,प्रशांत चव्हाण,किशोर अरबुने शिवाजी सुळे, अशोक भोसले, हणमंत कारंडे, मानसिंग बँकेचे माजी संचालक अरुण नलवडे, क्रांती कारखान्याचे माजी संचालक संभाजी साळुंखे, अनिल साळुंखे, उत्तम जाधव, कृष्णा पतसंस्था चेअरमन दिलीप जाधव, व्हा चेअरमन विजय जाधव, आनंदा आरबुने, सुदाम ठीक, मानसिंग बँकेचे जनरल मनेजर संभाजी जाधव, राजारामबापू दुध संघाचे संकलन अधिकारी आर एस पाटील, उपसंकलन अधिकारी डी बी पाटील, संघाचे सुपरवायजर संजय पाटील, संभाजी यादव, नितीन पाटील, सचिन पाटील, संतोष पाटील, विकास साळुंखे, जोतीराम साळुंखे, तानाजी चव्हाण, दिलीप नलवडे, तानाजी नलवडे, संदीप पाटील, सुनील जाधव, रमेश कदम, अतुल लोकरे,घोगाव्चे जयंत पाटील, विवेक नलवडे, सचिन मांडके, निलेश कदम, हर्षद जाधव, व डेअरी चे कर्मचारी वर्ग तसेच व इतर मान्यवर उपस्थित होते, स्वागत अशोक भोसले यांनी केले . आभार मॅनेजर दिगंबर जाधव यांनी मानले.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close