ताज्या घडामोडी

सहकार मंत्री विश्वजित कदम यांच्याहस्ते “दर्पण “दिनदर्शिकेचे थाटात प्रकाशन

वहिनी साहेब विजयमाला कदम, आमदार मोहनराव कदम, जतचे आमदार विक्रम सावंत, जितेश कदम यांची उपस्थिती

पलूस/भिलवडी :  स्व. डॉ.पतंगराव कदम यांचा आदर्श घेऊन वाटचाल करीत असलेले दर्पण मीडिया समूहाने कदम यांच्या जयंतीचे औचित्य साधून सहकार मंत्री डॉ विश्वजीत कदम यांच्या हस्ते दर्पण दिनदर्शिकेचे प्रकाशन थाटात करण्यात आले.

सोनहिरा सहकारी साखर कारखाना येथे स्व. पतंगराव कदम यांच्या स्मारकास्थळी डॉ पतंगराव कदम साहेब यांचे जयंती निमित्ताने दर्पण मीडिया समूहाकडून दर्पण दिनदर्शिकेच्या प्रकाशनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वहिनी साहेब विजयमाला कदम, आमदार मोहनराव कदम, जतचे आमदार विक्रम सावंत, युवा नेते जितेश कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम दादा पाटील, दक्षिण भाग सोसायटी चेअरमन बाळासाहेब मोहिते,  माजी सरपंच शहाजी गुरव, माजी सरपंच पांडुरंग टकले, माजी उपसरपंच बाळासाहेब मोरे, माजी उपसरपंच चंद्रकांत पाटील, माजी उपसरपंच गायकवाड साहेब, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बी. डी. पाटील, माजी तंटामुक्तीचे उपाध्यक्ष बाबासाहेब मोहिते, भिलवडी व्यापारी संघटनेचे कार्याध्यक्ष जावेद तांबोळी, सामाजिक कार्यकर्ते थनंजय पाटील, पी. ए. सचिन सावंत, असे राजू मोहिते, दर्पण न्यूज चे मुख्य संस्थापक तथा संपादक अभिजीत रांजणे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नेहमीच दर्पण मीडिया समूहाला स्व. डॉ पतंगराव कदम साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि भरीव योगदान असत होते. कदम साहेब यांच्या विचाराचा वारसा घेऊन वाटचाल करीत असलेले सहकार मंत्री डॉ विश्वजीत कदम यांचेही दर्पण मीडिया समूहाला सहकार्य लाभत असते.

दर्पण मीडिया समूहाच्या दिनदर्शिकेसाठी जाहिरातदार, वाचक आणि हितचिंतक यांनी सर्वच बाजूंनी दिलेली साथ दर्पण समूह कदापि विसरणार नाही.  दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यासाठी भिलवडी येथील  काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी आणि मान्यवरांनी मोठा उत्साह आणि तळमळ दाखवली, ते आम्ही विसरणार नाही. असेच सहकार्य लाभावे, असे हि विनंती.

वाहिणी साहेब विजयमाला कदम यांच्या हस्ते दर्पण दिनदर्शिकेचे प्रकाशन

आमदार मोहनराव कदम यांच्या हस्ते प्रकाशन

युवा नेते जितेश कदम यांच्याहस्ते प्रकाशन

काही क्षणचिञ….!!!!🙏🙏🙏

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close