ताज्या घडामोडी

वाळू, रेती उत्खननाकरिता योग्य स्थळांचा सर्वेक्षण अहवाल जनतेच्या अभिप्राय, सूचनांसाठी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध : अपर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम

सांगली  : सांगली जिल्ह्यातील वाळू / रेती उत्खननाकरीता योग्य असलेल्या वाळूस्थळाचे / रेतीघाटाचे तपशिलाचा समावेश करून जिल्हा सर्वेक्षण अहवाल सुधारीत करण्यात आला आहे. या अहवालाची सुधारीत आवृत्ती सर्व जनतेच्या अवलोकनार्थ तसेच अभिप्राय/सूचना प्राप्तीकरिता जिल्ह्याच्या sangli.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने अभिप्राय/सूचना जिल्हा वाळू संनियंत्रण समिती खनिकर्म शाखा जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांच्याकडे 30 दिवसाच्या कालावधीत आक्षेप/तक्रार/निवेदन/ठराव इत्यादी लेखी स्वरूपात किंवा sanglimining@gmail.com या ईमेलवर सादर कराव्यात, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम यांनी केले आहे.
वाळू/रेती निर्गती धोरण शासन निर्णय दि. 3 सप्टेंबर 2019 तसेच केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व वातावरण बदल, मंत्रालय नवी दिल्ली यांनी जानेवारी 2020 मध्ये प्रसिध्द केलेल्या वाळू/रेती उत्खनन मार्गदर्शक सूचनेनुसार (Enforcement And Monitoring Guidelines for Sand Mining) सांगली जिल्ह्यातील रेती घाटांचे सर्वेक्षण करून तालुकास्तरीय सनियंत्रण समितीने लिलावासाठी योग्य असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केला असल्याचे अपर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम यांनी सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close