गोवासिनेमा

“इफ्फी” गोमंकीय निर्मात्यांनी अर्ज भरण्यासाठी 4 जानेवारी शेवटची तारीख

गोवा, पणजी : 51व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) गोमंतकी चित्रपटांना व्यासपीठ देण्यासाठी विशेष विभाग ठेवण्यात आला आहे. ‘विशेष गोवन विभाग: कोंकणी व मराठी फिचर, नॉन फिचर चित्रपट’ या विभागात यंदा गोमंतकीय चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत, असे गोवा मनोरंजन संस्थेकडून गुरूवारी जाहीर करण्यात आले आहे. या विभागासाठी गोमंतकीय चित्रपट निर्माते व दिग्दर्शकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

या विशेष विभागासाठी 1 नोव्हेंबर 2019 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत तयार झालेले मराठी, कोंकणी सेंसर्ड अथवा अनसेंसर्ड चित्रपट पात्र ठरणार आहेत. या विभागात चित्रपट प्रदर्शित करण्यास इच्छुक सिने निर्मार्त्यांनी www.esg.co.in या वेबसाईवर लॉग इन करून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी. विशेष विभागासाठी चित्रपट पाठविण्याची अंतिम तारीख 4 जानेवारी 2021 आहे, याची नोंद घ्यावी, असे मनोरंजन संस्थेकडून कळविण्यात आले आहे.

इफ्फी यंदा 16 ते 24 जानेवारी हायब्रिड पध्दतीने होणार आहे. महोत्सवाची तयारी सध्या सुरू झाली आहे. महोत्सवासाठी आवश्यक निविदा प्रक्रिया तसेच अन्य तयारी मनोरंजन संस्थेकडून केली जात आहे. यंदा इफ्फी त फिचर विभागात 23 तर नॉन फिचर विभागात 21 चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. इफ्फी तील मास्करक्लास चे सत्र यंदा ऑनलाईन पध्दतीने होणार असून यात ‘प्री प्रोडक्शन ते पोस्ट प्रोडक्शन’ असे सर्व विषय समाविष्ट करण्यात येणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close