ताज्या घडामोडी

रेशनकार्डमध्ये लाभार्थ्यांचे शंभर टक्के आधार सिडींगसाठी मोहिम: जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे

़सांगली : केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी मोहिम राबवून लाभार्थ्यांचे आधार व मोबाईल सिडींग सुधारणे आवश्यक आहे. याकरीता रास्तभाव दुकानांतील ई पॉस उपकरणांमधील e kyc व मोबाईल सिडींग सुविधेचा अधिकतम वापर करुन आधार व मोबाईल क्रमांक सिडींगचे प्रमाण वाढवणेची मोहिम सुरु करण्यात आलेली आहे. दिनांक 31 जानेवारी 2021 पूर्वी प्रत्येक रेशनकार्डमध्ये लाभार्थ्यांचे 100 टक्के आधार सिडींग आणि किमान एक वैध मोबाईल क्रमांक सिड करण्याच्या उद्दिष्टाने सांगली जिल्ह्यात मोहिम राबविण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी दिली.
एक राष्ट्र एकच रेशनकार्ड ही केंद्रशासनाची महत्वाकांक्षी योजना असून शिधापत्रिकेस आधार सिडींग 100 टक्के पूर्ण असणे हा या मोहिमेचा महत्वाचा टप्पा आहे. ही मोहीम राज्य पातळीवर राबविण्याबाबत केंद्र शासनाने सुचना दिलेल्या आहेत. ही मोहिम फलद्रुप होण्यासाठी राष्टीय अन्नसुरक्षा योजनेतील शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक व आधार सिडींग 100 टक्के पूर्ण असणे आवश्यक आहे. या योजनेमुळे भविष्यात देशातील कोणतीही व्यक्ती कोणत्याही ठिकाणी रेशनकार्डवर धान्य घेवू शकणार आहे. यासाठी 100 टक्के लाभार्थ्यांनी त्यांचे आधार सिडींग करणे व एक वैध मोबाईल नंबर रेशनकार्डास जोडणे आवश्यक आहे.
सांगली जिल्ह्यामध्ये प्राधान्य कुटुंब योजनेमधील एकूण 379099 शिधापत्रिकेपैकी 84 टक्के लाभार्थ्यांचे आधार सिडींग झाले असून अद्याप 269580 लाभार्थ्यांनी अजून त्यांचे आधार रेशनकार्डास जोडलेले नाही . तसेच अंत्योदय अन्न योजनेतील एकूण 31740 शिधापत्रिकेपैकी 82 टक्के शिधापत्रिकेचे आधार सिडींग पूर्ण झाले असून अद्याप 23570 लाभार्थ्यांनी अजून त्यांचे आधार रेशनकार्डास जोडलेले नाही. तसेच शिधापत्रिकेस मोबाईल नंबर ही जोडणे आवश्यक असून शिधापत्रिकाधारकांनी दिलेले बरेच मोबाईल नंबर हे अवैध आहेत. तरी राष्टीय अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट असणाऱ्या लाभार्थ्यांनी त्यांचा वैध नंबर ही शिधापत्रिकेस जोडणे आवश्यक आहे.
धान्याचे मासिक वाटप करतेवेळी ई पॉस उपकरणाव्दारे रास्तभाव दुकानदार यांच्यामार्फत शिधापत्रिकेतील लाभार्थ्यांचा आधार व मोबाईल क्रमांकाचे सिडींग करण्यात येणार आहे. तहसिल कार्यालयामार्फत रास्त भाव दुकाननिहाय आधार सिडींग न झालेल्या लाभार्थ्यांची रास्त भाव दुकाननिहाय यादी करण्यात येणार असून 31 जानेवारी 2021 पूर्वी यादीमधील लाभार्थ्यांचे आधार व मोबाईल क्रमांक 100 टक्के सिडींग करण्यात येणार आहे.
प्राधान्य कुटुंब लाभार्थी येाजना व अंत्योदय अन्न योजनेतील ज्या लाभार्थ्यांचे रेशनकार्डमधील आधार क्रमांक सिडींग केलेले नाही त्यांनी संबंधित रास्त भाव दुकानदारास संपर्क साधून आपले आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक ekyc करुन घ्यावे. केंद्र शासनाच्या सुचनेनुसार 31 जानेवारी 2021 पर्यंत आधार सिडींग न झालेल्या लाभार्थ्यांचे अनुज्ञेय धान्य पुढील महिन्यापासून आधार सिडींग होईपर्यंत निलंबित करुन त्या लाभार्थ्यास धान्य मिळणार नाही. तरी अन्नसुरक्षा लाभार्थ्यांनी आपला आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक रेशनकार्डास संलग्न करुन घ्यावा. ही मोहिम दिनांक 31 जानेवारी 2021 अखेर 100 टक्के पूर्ण करावी, असे आवाहन श्रीमती बारवे यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close