ताज्या घडामोडी

उद्योगपती सी आर सांगलीकर यांच्या “अथर्व मल्टिपल अर्बन बँके”च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

मिरज :. सी.आर.सांगलीकर यांच्या मार्गदर्शना खाली चालू असलेल्या अथर्व मल्टिपल अर्बन इंडिया निधी लिमिटेड बँकेची दिनदर्शिकाचे प्रकाशन सोहळा मिरज शाखेत उत्साहात झाला.

या दिनदर्शिकेत बँकेच्या विविध योजनांची माहिती दिली आहे. गोरगरीबांच्या उन्नतीसाठी या निधी बँकेची सुरुवात केली आहे. छोटे मोठे व्यावसायीकांसाठी व बचत गटांना खुप उपयुक्त योजना राबविण्यात येत आहेत. खूप कमी वेळात मिरज शहर व मिरज पूर्व भागातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

यावेळी बँकेच्या चेअरमन . तृप्ती घोलप,  मोहसीना मुजावर, सुचिता लामदाडे, प्रियंका कांबळे, नरेंद्र दांडे, संस्थेचे संचालक डॉ. बसवराज पाटील, डॉ. उस्मानगणी मुजावर, महेश शिवशरण, प्रदिप कांबळे, दिपक कांबळे आदी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close