ताज्या घडामोडी

30 डिसेंबर रोजी सायं 5.30 पर्यंत पारंपरिक पद्धतीने नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास मान्यता : प्रभारी जिल्हाधिकारी गोपीचंद कदम

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक रणधुमाळी

सांगली, दि. 29  : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी पारंपरिक पद्धतीने (Offline Mode) नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली असल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी दिली.
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने संगणक प्रणालीद्वारे दिनांक 23 ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र सादर करण्यास मुदत दिली होती. मात्र संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्र दाखल करताना दिनांक 28 डिसेंबर रोजी सायंकाळपासून काही तांत्रिक अडचणी जसे इंटरनेट गती कमी, सर्व्हर अडचण इ. तक्रारी आयोगाकडे प्राप्त झाल्या आहेत. ही बाब विचारात घेता, इच्छूक उमेदवार नामनिर्देशनापासून वंचित राहू नये आणि त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळावी म्हणून राज्य निवडणूक आयोगाने नामनिर्देशनपत्र पारंपरिक पध्दतीने (Offline Mode) सादर करण्यासाठी मान्यता दिली आहे. तसेच नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ देखील दिनांक 30 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडील सूचनानुसार सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधितांनी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी पारंपरिक पध्दतीने नामनिर्देशनपत्र वाढीव वेळेत स्वीकारावी. नामनिर्देशनपत्र व घोषणापत्र यांचे कोरे नमुने इच्छुक उमेदवारांना उपलब्ध होतील याची व्यवस्था करावी. तसेच याबाबतची स्थानिक पातळीवर प्रसिध्दी देण्यात यावी. पारंपरिक पध्दतीने स्वीकारलेले नामनिर्देशन पत्र संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वैध नामनिर्देशनपत्र संगणक चालकांच्या मदतीने संगणक प्रणालीमध्ये RO login मधून भरुन घेण्यात यावे, असे राज्य निवडणूक आयोगाने प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले असल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी दिली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close