ताज्या घडामोडी

पालकमंत्री जयंत पाटील यांचा सांगली जिल्हा दौरा

सांगली : राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील गुरूवार, दि. 17 डिसेंबर 2020 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरूवार, दि. 17 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता मोटारीने मुंबईहून सांगलीकडे प्रयाण. दुपारी 1.30 वाजता इस्लामपूर येथे आगमन व राखीव. सायंकाळी 4.30 वाजता शिराळा कडे प्रयाण. सायंकाळी 5 वाजता विश्वासराव नाईक साखर कारखाना, चिखली येथे आगमन व राखीव. सायंकाळी 5.30 वाजता आमदार मानसिंगराव नाईक यांच्या मुलाच्या लग्न समारंभास उपस्थिती. सायंकाळी 6.15 वाजता चिखलीहून इस्लामपूरकडे प्रयाण. सायंकाळी 7 वाजता इस्लामपूर येथे आगमन व राखीव. सायंकाळी 7.30 ते 10.00 वाजेपर्यंत इस्लामपूर शहर बुथ प्रभाग संपर्क बैठकांना उपस्थिती. रात्री कारखाना मुक्काम.
शुक्रवार, दि. 18 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता वारणानगर, जि. कोल्हापूरकडे प्रयाण. दुपारी 1.15 वाजता वारणानगरहून इस्लामपूरकडे प्रयाण. दुपारी 2.30 ते 3.30 वाजेपर्यंत राजारामबापू पाटील पुरस्कृत पाणी पुरवठा संस्था मालेवाडी संदर्भात उत्तम खवरे, संभाजी पाटील, डी. एम. पाटील, इरिगेशन विभाग व सहकार आयुक्त श्री. कवडे यांच्यासमवेत चर्चा, स्थळ – कारखाना. सायंकाळी 4 वाजता महादेवनगर घरकुलास भेट, स्थळ – महादेवनगर, इस्लामपूर. सायंकाळी 5 वाजता घरकुलास भेट – कापुसखेड रोड इस्लामपूर. सायंकाळी 5.30 वाजता इस्लामपूर पोलीस दलाच्या वतीने उभारण्यात आलेल्या खुल्या व्यायाम शाळेच्या लोर्कापण समारंभास उपस्थिती, स्थळ – पोलीस परेड ग्राऊंड इस्लामपूर. सायंकाळी 6.30 ते 8.00 वाजेपर्यंत इस्लामपूर शहर बुथ प्रभाग संपर्क बैठकांना उपस्थिती. रात्री कारखाना मुक्काम.
शनिवार दि. 19 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता इस्लामपूरहून सांगलीकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता सांगली येथे आगमन व महा आवास अभियान ग्रामीणच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेस उपस्थिती, स्थळ – जिल्हाधिकारी कार्यालय सांगली. दुपारी 12.30 वाजता आलारा ता. शिरोळ शेती पाणी पुरवठा परवान्याबाबत कार्यकारी अभियंता, जलसंपदा यांच्यासमवेत चर्चा, स्थळ – जिल्हाधिकारी कार्यालय सांगली. दुपारी 2 वाजता श्री. समर्थ हार्ट केअर क्लिनीकच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती, स्थळ – विश्रामबाग, महालक्ष्मी चौक, मुख्य इमारत, पहिला मजला. दुपारी 3 वाजता नितीन नाईक यांच्या हॉटेल दिव्यजीत एक्झिक्युटीव्ह या नुतन हॉटेलचे उद्घाटन, स्थळ – सांगली कोल्हापूर रोड, केटीएम शोरूमच्यासमोर. सायंकाळी 4 वाजता हॉटेल मृदगंध या नुतन हॉटेलचे उद्घाटन, स्थळ – कसबे डिग्रज, लक्ष्मी फाटा. सायंकाळी 5.30 वाजता आष्टा शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नुतन कार्यालयाच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. रात्री कारखाना मुक्काम.
रविवार दि. 20 डिसेंबर रोजी सकाळी 11.15 वाजता आबीद मोमीन यांच्या मुलीचे लग्न समारंभास उपस्थिती, स्थळ – परदेशी हॉल, डांगे पंपाच्या पाठीमागे पेठ-सांगली रोड, इस्लामपूर. दुपारी 12 वाजता मोटारीने किंवा खाजगी हेलिकॉप्टरने इस्लामपूरहून मुंबईकडे प्रयाण.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close