ताज्या घडामोडी

भिलवडी येथे 16 डिसेंबर ” विजय दिवस ” उत्साहात साजरा..

1971च्या लढाईमध्ये सहभागी भिलवडीतील सैनिकांचा सत्कार

भिलवडी  : भिलवडी येथे 16 डिसेंबर रोजी विजय दिवस ” उत्साहात साजरा करण्यात आला. 1971च्या लढाईमध्ये सहभागी भिलवडीतील सैनिकांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.

16 डिसेंबर 1971 भारत-पाकिस्तान लढाई मध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानवरती मोठा विजय मिळवला होता. 3 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानने भारताच्या 11 एयरफोल्ड्स वरती मोठा हमला केला. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन देशामध्ये मोठी लढाई झाली. पाकिस्तानच्या सैनिकांवरती तुटून पडलेल्या भारतीय  सैनिकांनी अवघ्या 13 दिवसात पाकिस्तानला धूळ चारत या लढाईमध्ये मोठा विजय मिळविला.

या लढाई दरम्यान भारतीय सैनिकांनी पाकिस्तानच्या 1 लाख सैनिकांना पकडून बांगलादेशाला पाकिस्तान पासून मुक्त केले. म्हणून 16 डिसेंबर हा दिवस भारतीयांच्या अभिमानाचा दिवस आहे.16 डिसेंबर हा दिवस भिलवडीकरांचा देखील मोठा अभिमानाचा दिवस आहे.

1971 मध्ये भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये झालेल्या लढाईत भारतीय सैन्य दलात कार्यरत असणारे भिलवडीचे सैनिक -मारुती ज्ञानू शेणोले , तुकाराम सावंत , शंकर पांडुरंग साळुंखे , विठ्ठल दत्तात्रय साळुंखे , मुबारक चाँद पठाण , युसुफ गुलाब पठाण हे या लढाईमध्ये प्रत्यक्षात सहभागी होते.या सैनिकांचा भिलवडीकरकरांना मोठा अभिमान आहे.  16 डिसेंबर रोजी ” विजय दिवसाच्या ” निमित्ताने भिलवडी येथे आजी-माजी सैनिक संघटना, भिलवडी, यांच्यावतीने या  सैनिकांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भिलवडीचे तलाठी – गौसमोहम्मद लांडगे ,  सुभाष कवडे सर यांच्यासह आजी-माजी सैनिक संघटना भिलवडी अध्यक्ष – कुमार बापू पाटील , सचिव – जी. के. शेख , कार्यकारी उपाध्यक्ष – मारुती यादव , उत्तम कांबळे , युवा माजी सैनिक कयुम पठाण , प्रताप पाटील , बाळासाहेब माने , मुकुंद तावदर , भालचंद्र सकळे , रामचंद्र माळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन माजी सैनिक व संघटनेचे सचिव जीके शेख यांनी केले. मारुती यादव मेजर यांनी आभार मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close