ताज्या घडामोडी

भिलवडी परिसरात वाळू तस्करी जोमात, प्रशासन कोमात

कडक कारवाई करण्याची लोकांची मागणी

पलूस : पलूस तालुक्यातील भिलवडी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून राञाची वाळू तस्करी जोमात सुरू असल्याने प्रशासन कोमात आहेत की काय असा प्रश्न लोकांना सतावत आहे. वाळूच्या भरलेल्या गाड्या राञीच्या वेळी भरधाव वेगाने जात असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे संबंधितांनी वेळीच खबर घ्यावी, अशी मागणी लोकांतून होत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून भिलवडी येथील दत्तनगर मार्गे मध्यराञी 3 पर्यंत मोठ्या प्रमाणात लाल मातीची वाहतूक होत होती. त्यामुळे या भागात राहणाऱ्या लोकांना ञास सहन करावा लागत होता. हा प्रकार कुठे तरी थांबण्याची मागणी लोकांतून होत असलेचे पाहून संबंधितांनी मातीची वाहतूक थांबवली. माञ, हे दुर्दैवी घटना काही दिवस थांबवली असता पुन्हा काही प्रशासकीय अधिकारी यांच्या आशिर्वादाने भिलवडी परिसरात वाळू तस्करी जोमात सुरू आहे. यावर वेळीच कारवाई करावी अशी मागणी लोकांतून होत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close