सांगली

पलूस तालुक्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

दलित मित्र भगवानराव जाधव यांनी अंकलखोप येथे पुष्पचक्र अर्पण करण्याची परंपरा जपली

 

 

पलूस : पलूस तालुक्यातील भिलवडी, माळवाडी, अंकलखोप, दुधोंडी आदी गावांसह अनेक ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या  महापरिनिर्वाणदिनी  प्रतिमेचे पूजन करून भीम अनुयायांनी अभिवादन केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी अंकलखोप येथे असल्याने सांगली जिल्हयासह बाहेर गावाहून हजारो अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी  येथे येतात. कोरोनाने  शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत भिम अनुयायांनी सार्वजनिक कार्यक्रमांना फाटा देत, बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्रिसरण पंचशिला ग्रहण करून, घरीच अभिवादन करणे पसंत केले.

, शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा असा अनमोल मंत्र देणारे, तसेच आपल्या शिक्षणाच्या अनुभवातून लेखणीच्या सहाय्याने भारताच्या संस्कृतीची विविधतेतून एकता प्रस्थापित करण्यासाठी, समता, न्याय, बंधूता याची एकसंघ पणे मांडणी करून, सर्वसामान्यांना मतदानाचा हक्क देवून रंकाचा राव करणाऱ्या तसेच अखंड विश्वात आदर्श अशी भारतीय राज्यघटना लिहून, लोकशाहीचे राज्य प्रस्थापित करणारे, तसेच जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत भगवान गौतम बुध्दांचा अहिंसावादी धम्म स्विकारुन, जनतेला धम्मरुपी नवसंजीवनी देणारे दलितांचे कैवारी, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याांचे ६ डिसेंबर १९५६ महानिर्वाण झाले. यावेळी बाबासाहेबांना अखेरचा निरोप देण्यासाठी देशभरातील लाखो अनुयायी मुंबई येथे दाखल झाले होते. रक्षा विसर्जना वेळी कडक पोलिस बंदोबस्त व समता सैनिकांना चकवा देत, जिवाची पर्वा न करता अंकलखोप ता. पलूस येथील यशवंत दादू लांडगे, गणपत महादू लांडगे, रामचंद्र मारूती लांडगे व लुमा लखू लांडगे यांनी बाबासाहेबांच्या अस्थी अंकलखोप गावी आणून, तत्पूर्वी बाबासाहेब अंकलखोप गावी सभेच्या निमित्ताने आले तेंव्हा ज्या ठिकाणी पहिले पाऊल टाकले त्या ठिकाणी त्यांच्या अस्थीचे जतन करून स्मृती स्थळ बनविले.

मुंबई येथील चैत्यभूमीवर देशभरातून लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात. त्याच पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील अंकलखोपची मिनी चैत्यभूमी समजल्या जाणाऱ्या बाबासाहेबांच्या या स्मृती स्थळी अभिवादन करण्यासाठी जिल्हयातून भिम अनुयायी अंकलखोप येथे येतात.आजही बाबासाहेबांच्या स्मृती स्थळी दर्पण चे मुख्य संपादक अभिजीत रांजणे,

जि.प. सदस्य सुरेंद्र वाळवेकर, अंकलखोपचे सरपंच अनिल विभूते, उद्योजक राजेश चौगुले, संदेश भंडारे, बोधिसत्व माने,बौद्धाचार्य दलित मित्र भगवान जाधव, अमरजीत कांबळे, यांनी बाबासाहेबांच्या स्मृती स्थळास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.तत्पूर्वी पहाटे स्मृती स्थळावर भिलवडी येथील पंचशिल नगरमधील महिलांसह लहानथोर अनुयायांनी कँडल मार्च काढून, त्रिसरणपंचशिला ग्रहण करुन बाबासाहेबांना अभिवादन केले. दरम्यान भिलवडी येथील पंचशिल नगर येथील बुध्द विहारामध्ये बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून, त्रिसरण पंचशिला ग्रहण करून अभिवादन करण्यात आले.  माळवाडी येथे भिलवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल जगताप यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close