महाराष्ट्रसांगली

ग्रामपंचातींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीच्या कार्यक्रमांतर्गत 5 डिसेंबर शासकीय सुट्टीच्या दिवशीही हरकती, सूचना स्वीकारण्यात येणार

सांंगली : सांगली जिल्ह्यातील माहे जुलै ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमानुसार हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी 1 ते 7 डिसेंबर 2020 पर्यंत असून राज्य निवडणूक आयोगाकडील सुचनेनुसार दिनांक 5 डिसेंबर 2020 या शासकीय सुट्टीच्या दिवशीही कार्यालयीन वेळेत हरकती व सूचना स्वीकारण्यासाठी तहसिल कार्यालयात विशेष कक्षाची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) विजया यादव यांनी दिली.
सांगली जिल्ह्यातील माहे जुलै ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 152 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी जाहीर करण्यात आलेल्या मतदार यादीच्या कार्यक्रमानुसार प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक 1 डिसेंबर 2020, हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी 1 ते 7 डिसेंबर 2020 तर प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक 10 डिसेंबर 2020 असा आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close