महाराष्ट्र

5000 पेक्षा जास्त पत्रकारांची एकाच वेळी आरोग्य तपासणी करण्याचा राष्ट्रीय विक्रम

परिषदेचा वर्धापन दिन राज्यभर आरोग्य दिन म्हणून साजरा

मुंबई दिनांक ३ डिसेंबर : जवळपास 250 तालुके आणि २६ जिल्हयातील पाच हजार पेक्षा जास्त पत्रकारांची आज मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी करण्याची ही देशातील पहिलीच आणि एकमेव घटना आहे.. मराठी पत्रकार परिषदेचा आरोग्य तपासणी उपक़म यशस्वी केल्याबद्दल परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी राज्यातील पत्रकार आणि पत्रकार संघांचे आभार मानले आहेत..
३ डिसेंबर रोजी मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन असतो.. हा दिवस राज्यात आरोग्य दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा अ. भ. मराठी परिषदेने केली होती.. त्यानिमित्त राज्यभर आरोग्य शिबिरांचे आयोजन करून 5000 पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी करण्याचा संकल्प परिषदेने सोडला होता..तयानुसार राज्यात 26 जिल्हा हेडकॉर्टर्स आणि जवळपास 250 तालुका ठिकाणी आरोग्य शिबिरं घेण्यात आली.. कोकणातील दोडामार्ग, मालवण, सावंतवाडी, चंदगड, रत्नागिरी, पेणपासून ते विदर्भातील सावली नागपूर, चंद्रपूर, भंडारा, अकोला गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातही शिबिराचे आयोजन करण्यात आले .. मराठवाडयील बीड, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील बहुतेक जिल्ह्यात शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते..बीड जिल्ह्यात वडवणी, गेवराई, बीडसह बहुतेक तालुक्यात पत्रकारांची आरोग्य तपासणी केली गेली.. पुणे शहरात शिबिर झालं नसलं तरी बारामती, इंदापूर, हवेली, पिंपरी चिंचवड, दौंड, पुरंदर आणि अन्य बहुतेक तालुक्यात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.. नाशिक जिल्ह्यात तसेच नगर शहर आणि गा़मीण भागात झालेल्या शिबिरातून अनेक पत्रकारांनी स्वतः च्या आरोग्याची मोफत तपासणी करून घेतली..धुळे तालुका पत्रकार संघानं घेतलेल्या ़शिबिरास चांगला प़तिसाद मिळाला.. सातारा जिल्ह्यात वाई, भुइंज तसेच अन्य तालुक्यात शिबिरं घेतली गेली.. सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातही शिबिरांना चांगला प्रतिसाद मिळाला..
राज्यात घेतल्या गेलेल्या शिबिरातून थायरॉइड, कोलेस्टेरॉल, रक्त तपासणी, हृदय विकार, किडनीचे आजार, वात विकार, कोविड टेस्ट तसेच ऑक्सीजन लेवल, रक्तदाब, इसीजी, एक्सरे आदि स्थानिक उपलब्धतेनुसार तपासण्या केल्या गेल्या.. नगर येथे नेत्रविकार तपासण्यात आले..
एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येनं पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्याची ही देशातील पहिलीच आणि एकमेव घटना आहे.. स्थानिक डॉक्टर्स तसेच जिल्हा आणि तालुका रूग्णालयाच्या मदतीने पत्रकार संघांनी शिबिरांचे आयोजन केले होते.. ते यशस्वी करण्यासाठी गेली चार दिवस जिल्हा आणि तालुका संघांचे पदाधिकारी प़यत्नांची शिकस्त करत होते.. आरोग्य दिन यशस्वी केल्याबद्दल परिषदेचे एस.एम.देशमुख, विश्‍वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी, कोषाध्यक्ष विजय जोशी, महिला संघटक जान्हवी पाटील, राज्य प़सिध्दी प्रमुख अनिल महाजन यांनी सर्वांचे तसेच सहकार्य करणारया डॉक्टरांचे आणि वैद्यकीय स्टाफचे आभार मानले आहेत..
*चार महिन्यात 43 पत्रकारांचे मृत्यू
राज्यात ऑगस्ट पासून आजपर्यंत 43 पत्रकारांचे कोरोना किंवा तत्सम आजाराने मृत्यू झाले आहेत.. चारशेवर पत्रकार पॉझिटिव्ह झाले होते.. या पार्श्‍वभूमीवर पत्रकारांच्या आरोग्याचा प़शन एेरणीवर आला होता.. डॉ. श्रीकांत शिंदे फॉडैशनने केलेली मदत वगळता पत्रकारांना सरकार, वयवसथापनासह सर्वांनीच वारयावर सोडले होते.. त्यामुळे आपणच आपली काळजी घेतली पाहिजे या जाणिवेतून पत्रकारांच्या आरोग्याची तपासणी करण्याचा संकल्प परिषदेने सोडला होता.. त्याला अभूतपूर्व यश मिळाले..

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close