महाराष्ट्रसांगली

सावळज येथे इच्छापूर्ती विवाह संस्थेची एकदिवसीय सहविचार सभा उत्साहात

266 लग्नाच्या रेशीम गाठी गुंफनाऱ्या इच्छापूर्ती विवाह संस्थेचे सर्वञ कौतुक


तासगाव  : संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या स्वतंत्र आणि सलग्न 47 शाखेच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना चोख सेवा देणाऱ्या आणि अल्पावधीतच 266 लग्नाच्या रेशीम गाठी गुंफनाऱ्या इच्छापूर्ती विवाह संस्थेची कोरोनामुळे लांबलेली एक दिवसीय सहविचार सभा खेळीमेळीेत हॉटेल मोरया सावळज येथे रविवार ता. 29/11/20 रोजी दिवसभर पार पडली.
त्यावेळी गेले वर्षभर आपल्या ग्राहकांची लग्ने जमावित म्हणून अपरंपार कष्ट घेतलेल्या सांगोला,निंबळक,वाई,क.महांकाळ,सातारा,भांडुप आणि अंजनी या गुणवंत आणि निष्ठावंत शाखा सहकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. नवीन शाखा सहकाऱ्यांना संस्थेची प्रमाणपत्र देऊन आपल्या वयाची 50 वर्षे पूर्ण होऊन सुद्धा संस्थेसाठी वाहून घेतलेल्या 50 वर्षापुढील श्री.तानाजी कदम, श्री.अशोक भाऊ पाटील, श्री भास्कर मिसाळ आणि सौ. चित्रा शिंदे मॅडम यांचा या वयात सुद्धा इच्छापूर्ती विवाह संस्थेतील त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल इच्छापूर्ती विवाह संस्थेचे संस्थापक एम डी श्री दत्तात्रय पाटील,अंजनी यांचे हस्ते शाल व श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित केले. इच्छापूर्तीतून एक वर्षापूर्वी जाती पातीच्या बेड्या जुगारून, विवाह बंधनात अडकलेले श्री व सौ. मालुसरे कुटुंबीय यांनी पाटील पती पत्नीचा सत्कार केला तर यावेळी सौ.भारती चव्हाण – मालुसरे यांनी आपल्या दीड मिनिटाच्या बोलिने सर्वांच्या डोळ्यात अश्रू आणले आणि श्री.तानाजी मालुसरे यांच्या बरोबरच उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी वीरभद्र कृषी विद्यालय शिद्धेवाडी चे सह शिक्षक श्री.संतोष जाधव सर यांनी आपल्या पठडीतल्या बोलितून उपस्थितांना घायाळ केले तर इच्छापूर्ती विवाह संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.पाटील यांनी आपल्या शेलक्या शब्दात आपल्या सहकाऱ्यांना मंत्रमुग्ध आणि प्रफुल्लित केले.
यावेळी इच्छापूर्ती चॅरिटेबल ट्रस्ट च्या उपाध्यक्षा सौ.आनंदी पाटील ,संचालक श्री.संभाजी पाटील आणि खजिनदार सौ. सीमा पाटील हे उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close