महाराष्ट्र

सोलापूर जिल्ह्यातून विविध शिक्षक,सामाजिक संघटनांचा “आप”च्या डॉ.अमोल पवार यांना पाठिंबा

सोलापूर  : पुणे पदवीधर निवडणुक 2020 मधील आम आदमी पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉ.अमोल पवार यांना सोलापूर जिल्ह्यातील विविध शिक्षक व सामाजिक संघटनांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. डॉ.अमोल पवार यांच्यासारखा उच्च विद्याविभूषित, समाजकारणाची, पदवीधरांच्या प्रश्नांची जाण असणारा उमेदवार अाम आदमी पार्टीच्या वतीने निवडणुकीच्या मैदानात आहे, हे मैदान आता ताकदीने मारायचे.. या आपल्या माणसाला एक नंबर पसंती क्रमांकाचे मत द्यायचे नी थेट विधान परिषदेवर पाठवायचे अशी एकच चर्चा सोलापूर च्या कानाकोपऱ्यात रंगत आहे.

सोलापुरातुन डॉ अमोल पवार यांना पदवीधरांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे. यामध्ये कुर्डुवाडी, माढा, बार्शी, अकलूज, माळशिरस येथील विविध शिक्षक संघटनांचा समावेश आहे. डॉक्टर संघटनांचाही पाठिंबा डॉ अमोल पवार यांना मिळत आहे. तसेच माढा येथील श्रीमंत राजे प्रतिष्ठानने डॉ. अमोल पवार यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला. या निवडणुकीत डॉ अमोल पवार यांच्या पाठीशी राहण्याचा ठाम निर्धार करून निवडणूकीत ताकतीने त्यांचे काम सुरू असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

डॉ अमोल पवार हे निष्कलंक चरित्र्याचे व सर्वात सक्षम उमेदवार अाहेत त्यामुळे या निवडणुकीत ते प्रचंड बहुमतांनी विजयी होतील यात शंकाच नाही असे मत यावेळी सर्व कार्यकत्यांनी व्यक्त केले.

डॉ अमोल पवार यांनी सोलापुर जिल्ह्यातील बार्शी येथील शिवाजी कॉलेज मध्ये जाऊन पदवीधरांची भेट घेतली व या निवडणुकीत काम करणार्या उमेदवाराच्या पाठिशी राहण्याची विनंती केली. शिक्षक पदवीधरांकडुनही त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याने सर्वत्र डॉ अमोल पवार यांच्या कार्यकत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

संध्याकाळी माळशिरस येथे कार्यकर्त्यांची भेट घेतली व त्यांचे प्रश्न समजुन घेतले. या निवडणुकीत मिळणार्या यश अपयशाचा विचार न करता सर्व पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे मत डॉ अमोल पवार यांनी व्यक्त केले.

डॉ अमोल पवार यांना सोलापुर जिल्ह्यातुन मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्धल सोलापुरकरांचे आभार मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close