सांगली

अरुण अण्णा लाड, प्रा. जयंत आसगावकर यांना प्रचंड मतांनी विजय करा : जयश्रीताई मदनभाऊ पाटील

सांगली : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना महाविकास आघाडीचे शिक्षक मतदार संघाचे अधिकृत उमेदवार प्रा. जयंत आसगांवकर  व पुणे पदवीधर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार  अरुण अण्णा गणपती लाड यांच्या प्रचारार्थ श्रीमती जयश्रीवहिनी मदनभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णूआण्णा भवन सांगली येथे महाविकासआघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.
यावेळी बोलताना जयश्रीताई म्हणाल्या, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या महा विकास आघाडीची पहिलीच निवडणूक आहे. सर्व पक्षाचे कार्यकर्ते एक दिलाने काम करतील. महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी मतदारांच्या पर्यंत पोहोचून दोन्ही उमेदवारांना पसंती क्रमांक 1 चे मतदान देण्यासाठी विनंती कररणे गरजेचे आहे. तसेच त्यांचे मतदान करून घेणे ही सर्वात मोठी जबाबदारी कार्यकर्त्यांनी पार पाडावी लागणार आहे . स्व.मदनभाऊंचे सर्व कार्यकर्ते या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. मदन भाऊंच्या कार्यकर्त्यांना एकदा आदेश दिला की प्रामाणिकपणे त्या आदेशानुसार आपली जबाबदारी ते पार पडतात .
यावेळी राष्ट्रवादीचे कॉग्रेस चे श्री. मनोज बाबा शिंदे, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सिकंदर जमादार, काँग्रेसचे विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, शिवसेनेचे कुपवाड अध्यक्ष अमोल पाटील, शंभूराज काटकर, रुपेश मोकाशी, संतोष पाटील, राम काळे, काँग्रेसचे माजी महापौर किशोर शहा, सुभाष यादव, आनंदराव पाटील, मदनभाऊ पाटील युवा मंचचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे, विष्णूआण्णा पाटील खरेदी विक्री संघाचे चेअरमन संग्राम दादा पाटील, नगरसेवक सागर घोडके, काँग्रेसचे सर्व नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close