महाराष्ट्रसांगली

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी 

पदवीधर-शिक्षक मतदार संघ निवडणूक मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकाऱ्यांची प्रशिक्षण कार्यशाळा

सांगली, दि. 20, : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक-2020 च्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार क्षेत्रिय अधिकारी यांच्यासाठी भावे नाट्यमंदिर सांगली येथे प्रथम प्रशिक्षण कार्यशाळा दि. 18 व 19 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली.

या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणुक कामासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. कोविड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर आदि नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
या कार्यशाळेत अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी मतदान व मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्याच्या अनुषंगाने प्रत्येकाची जबाबदारी व कार्य याबाबत सविस्तर माहिती दिली. मतदान अधिकाऱ्यांनी निवडणूक साहित्य ताब्यात घेताना तपासून घ्यावे, मतदानाच्या आदल्या दिवशी मतदान केंद्रावरील पूर्वतयारी करावी असे सांगून सर्वांनी आत्मविश्वासाने कार्यरत रहावे, असे आवाहन केले.
या प्रसंगी कडेगाव उपविभागीय अधिकारी गणेश मरकड, जिल्हा पुरवठा अधिकारी अधिकारी वसुंधरा बारवे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी शिल्पा ओसवाल यांनी निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने सविस्तर माहिती दिली. यावेळी मिरज उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, अप्पर तहसिलदार सांगली डॉ. अर्चना पाटील आदि उपस्थित होते.
एका टीममध्ये मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी 1, 2 व 3 असे एकूण 4 अधिकारी/कर्मचारी असून एका सत्रात 60 टीम या प्रमाणे दि. 18 व 19 नोव्हेंबर रोजी एकूण ४ सत्रात जवळपास 960 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. व्दितीय प्रशिक्षण दि. २३ व २४ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
या प्रशिक्षणाचे नियोजन अप्पर तहसिलदार सांगली कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक :
प्रत्येक मतदान केंद्रावर सुक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी जिल्ह्यात सुमारे 191 मतदान केंद्रे असून या प्रत्येक मतदान केंद्रावर सुक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने आज दि. २० नोव्हेंबर रोजी सुक्ष्म निरीक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी व अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन केले.
या प्रसंगी कडेगाव उपविभागीय अधिकारी गणेश मरकड, अप्पर तहसिलदार सांगली डॉ. अर्चना पाटील आदि उपस्थित होते. या प्रशिक्षणाचे नियोजन अप्पर तहसिलदार सांगली कार्यालयाच्या वतीने करण्यात आले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close