महाराष्ट्र

माध्यमिक,उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा केंद्राच्या ठिकाणी कलम 144 लागू

सांगली, दि. 19 : सांगली जिल्ह्यामध्ये उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा 2020 दिनांक 20 नोव्हेंबर ते दि. 10 डिसेंबर 2020 या कालावधीत होणार आहे. सांगली जिल्ह्यातील 11 परीक्षा केंद्रावर माध्यमिक तर 9 परीक्षा केंद्रावर उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी परिक्षा केंद्राच्या ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू केले आहे.
परीक्षा केंद्राच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी परिक्षा केंद्रावर इमारतीपासून 100 मीटर सभोवतालच्या परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा केंद्रावर दिनांक 20 नोव्हेंबर ते 05 डिसेंबर 2020 व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा केंद्रावर दिनांक 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2020 या कालावधीसाठी सकाळी 9 वाजल्यापासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत लागू केले असून खालील कृत्यांना मनाई केली आहे.
या आदेशानुसार वरील वेळेत दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी फिरण्यास मनाई केली आहे. एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई केली आहे. वरील वेळेत परिक्षा केंद्राच्या परिसरातील झेरॉक्स मशिन, टेलिफोन बुथ, फॅक्स मशीन, ध्वनीक्षेपक यांचा परिक्षा संदर्भात कोणत्याही गैरप्रकारासाठी वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच परिक्षा केंद्रात मोबाईल, पेजर नेण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावीत आलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही.
दिनांक 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2020 या कालावधीत घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10 वी नोव्हेंबर/डिसेंबर 2020 परीक्षेसाठी परीक्षा केंद्राचे नाव व कंसात केंद्र क्रमांक व नाव पुढीलप्रमाणे. सांगली हायस्कूल सांगली (2105 सांगली-अ), विद्यामंदिर प्रशाला मिरज ता. मिरज (2205 मिरज अ), कन्या शाळा शिराळा ता. शिराळा (2405 शिराळा), महात्मा गांधी विद्यालय आष्टा ता. वाळवा (2501 आष्टा), विद्यामंदिर हायस्कूल इस्लामपूर (2507 इस्लामपूर अ), श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल जत (2702 जत-अ), श्री महाकाली हायस्कूल कवठेमहांकाळ (2803 कवठेमहांकाळ), श्री भवानी विद्यालय आटपाडी (2901 आटपाडी), स्वामी रामानंद भारती विद्यामंदिर तासगाव (3007 तासगाव), विटा हायस्कूल विटा ता. खानापूर (3010 विटा-अ), लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर पलूस (3104 पलूस).
दिनांक 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2020 या कालावधीत घेण्यात येणाऱ्या इयत्ता 12 वी नोव्हेंबर/डिसेंबर 2020 परीक्षेसाठी परीक्षा केंद्राचे नाव व कंसात केंद्र क्रमांक व नाव पुढीलप्रमाणे. विलिंग्डन महाविद्यालय सांगली (213 सांगली नं. 3), शी. म. डॉ. बापुजी साळुंखे महाविद्यालय मिरज ता. मिरज (221 मिरज नं. 1), विश्वासराव नाईक महाविद्यालय शिराळा ता. शिराळा (242 शिराळा), आर्टस ॲण्ड कॉमर्स कॉलेज आष्टा (251 आष्टा), यशवंतराव चव्हाण कॉलेज इस्लामपूर (254 इस्लामपूर नं. 3), के. एम. हायस्कूल व ज्युनि कॉलेज जत (271 जत), प. डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय कवठेमहांकाळ (282 कवठेमहांकाळ), प. डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव (301 तासगाव), आर्टस, सायन्स ॲण्ड कॉमर्स कॉलेज रामानंदनगर ता. पलूस (312 रामानंदनगर).

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close