ताज्या घडामोडी

भाई गणपतराव देशमुख यांचा कार्यक्रमाच्या ठिकाणी “वेळेआधी” पोहोचण्याचा आदर्श घेतला : रोहित आर आर पाटील 

कोळा येथे ता सांगोला गावास सदिच्छ भेट

सांगोला : वार्ताहार
महाराष्ट्रात दिलेल्या वेळेत पोहोचणारे नेते हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच असून ज्येष्ठ माजी आमदार गणपतराव देशमुख अशीच एक व्यक्ती वेळेत नाहीतर वेळेपूर्वी सध्या विविध पोहोचत असते आबासाहेब वयाच्या 93 व्या वर्षीही हा वक्तशिरपणा अजूनही अखंडपणे सुरू आहे त्यांचा मी तासगाव विधानसभा मतदारसंघात कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळेअगोदर पोहोचण्याचा आदर्श घेतला आहे सध्या पोहोचत आहे असे मत राज्याचे माजी गृहमंत्री स्वर्गीय आर आर आबा पाटील यांचे चिरंजीव तासगावचे युवक नेते रोहित दादा आर आर पाटील यांनी व्यक्त केला आहे.
कोळा ता सांगोला येथे एका गाव भेटी प्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना रोहित दादा पाटील  म्हणाले आबासाहेबांना यांना जवळून पाहिलं आहे त्यांच्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून जनतेतून ऐकलं आहे 93 व्या वर्षी हा माणूस एवढा प्रवास करून वेळेचे अगोदर येतो याचं मला आश्चर्य वाटलं आबांचा वक्तशीरपणा आम्हा तरुण युवकांना खूप सांगून  गेला आबासाहेब आपल्या एका कृतीतून आमच्यासारख्या युवकांना शिकवत असतात आणि त्यांचा विषय हा समाजासाठी ग्रंथ असतो. सांगोला तालुका हा ज्येष्ठ माजी आमदार गणपतराव देशमुख महाराष्ट्रात एक समीकरण झाले आहे स्वर्गीय आर आर आबा पाटील यांचे व आबासाहेबांचे घनिष्ठ संबंध होते परंतु आज पर्यंत आपण त्यांच्या बद्दल ऐकून होतो आज कोळ्यात प्रत्यक्ष आल्यानंतर टेंभूचे पाणी सर्वदूर पोहोचलेले वाड्या वस्तीवरील भाग हिरवागार झाला आहे शेतकरी वर्ग सदन होत आहे गेल्या पन्नास वर्षातील आबासाहेब यांच्याही कष्टाचे फळ आहे. मला सांगायला अभिमान वाटतो आणि त्या व्यक्ती बद्दल मोठा आदर सुद्धा आहे आदरणीय आबासाहेब ज्यावेळी १९६२ ला आबासाहेब पहिल्यांदा आमदार झाले विशेष म्हणजे त्याच वर्षी जुन्या काळात त्यानी एल बी चे शिक्षण पूर्ण केले भाई गणपतराव देशमुख यांच्याकडून आपल्या अत्यंत जवळच्या व्यक्तीकडून फार काही शिकण्यासारखे आहे आबांनी १९६२ ला जर पुण्यात त्या जुन्या काळात एलएलबी पूर्ण केली असेल आजच्या सकारात्मक घडीला  त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी पुण्यात एल एल बी चे शिक्षण घेत आहे. समाजातील इतर विद्यार्थ्यांनीही ही याचा विचार केला पाहिजे. शिक्षण पूर्ण करण्याची तरुणांची जबाबदारी आहे खरतर डोंगर पाचेगाव मार्गे कोळे गावा मध्ये येताना गावाच्या भोवतालची परिस्थिती बघत होतो त्यावेळेस  कवठेमंकाळ सांगोला तालुका हा दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जात होता याची आठवण आली होती दुष्काळी भागात काय असते याच कुतुहुल सदन भागातील लोकांना राहिलेला आहे सध्या या भागाचे टेंभूच्या पाण्यामुळे नंदनवन झाल आहे असे रोहित पाटील यांनी शेवटी सांगितले.
Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close