ताज्या घडामोडी

संग्राम देशमुख आता होणार आमदार..!!!

मंत्री पद धुडकावून टेंभू योजना मागणाऱ्या संपतराव देशमुख अण्णांच्या मुलाला अखेर न्याय मिळाला

सांगली जिल्ह्यातील *दुष्काळी* भागात घाटमाथ्यावर *टेंभू योजनेमुळे* आज हा भाग *सुजलाम-सुफलाम* झाला आहे. या योजनेचे स्वप्न ज्यांनी पाहिले, या जलसिंचन योजनेचे *शिल्पकार, विधिज्ञ संपतराव देशमुख (आण्णा)* हे १९९५ मध्ये युतीच्या काळात *आमदार* होते, नुकतेच युतीचे शासन आले होते. अण्णांना *मनोहर जोशींचा* फोन आला, मुंबईला तत्काळ निघून या, अण्णा मुंबईला लगोलग पोहचले. मुंबईत पोहचल्यावर त्यांना आपली *मंत्री* पदी निवड करण्याचा विचार असल्याचे सांगितले, पण दुसऱ्या दिवशी सध्या स्पर्धा जास्त आहे, काय करावं अशी दोन्ही पक्षांची अडचण झाली. पण अण्णांना आम्ही तुमचा विचार करतोय, आपलं मत सांगा असं सांगण्यात आलं.. *त्यावर आण्णा म्हणाले मला एकवेळ मंत्री पद नसेल तर चालेल, पण माझ्या भागात नेहमीचा दुष्काळ आहे, शेतकऱ्यांमध्ये पिकवायची धमक आहे, पण पाणी नाही ,कृष्णा नदीचे पाणी देण्यासाठी टेंभू योजनेला मंजुरी द्या…*

त्यानंतर अण्णांचा *समजूतदारपणा* पाहून *मनोहर जोशींच्या* मनात अण्णांबद्दल *आदर* वाढला, त्यांनी त्याच *वर्षी* या योजनेला *मंजुरी* दिली, अर्थात ही योजना बेकायदेशीर असल्याचे त्यावेळी *अनेक आरोप झाले, विरोध झाले, पण अण्णांनी ते सगळं लिलया पेललं, आणि टेंभू योजना वास्तवात येण्याचा मार्ग मोकळा झाला..पुढे ती आशिया खंडातील सर्वात मोठी सिंचन योजना ठरली.*

हे डोंगर, घाटमाथ्यावर जिथं कृष्णा नदीच पाणी येईल असं कुठं असतंय का ?, हे केवळ *राजकीय स्वप्नच* आहे, असं म्हणणाऱ्या *शेतकऱ्यांना, राजकीय नेत्यांना* त्यावेळी उत्तर मिळाले होते. अखेर तो दिवस उजाडला *टेंभूचे उदघाटन* सुर्ली घाटाच्यावर घेण्याचा निर्णय झाला. *राज्याचे मुख्यमंत्री उदघाटनाला* येणार म्हणून जय्यत तयारी झाली, पण ऐनवेळी कोणीतरी तक्रार केली की, पाटबंधारे विभागाकडे जमीनच नाही, तर उदघाटन कसले, ही थाप आहे. अजूनही शेतकऱ्यांना विश्वास बसत नव्हता की कुष्णा घाटमाथ्यावर येणार आहे. त्यामुळं लोकही आता जमीनच नाही, त्यामुळं उदघाटन केवळ फार्स असल्याचं बोलू लागले, पण त्यावेळी अण्णांनी *तत्काळ* मुख्यमंत्र्याच्या कानावर ही गोष्ट घातली, आणि *रातोरात* घाटावरील एका शेतकऱ्याची *जमीन खरेदी* केली. आणि सकाळी त्याच जागेवर *टेंभू योजनेचे उदघाटन झाले…* पुढे योजनेचे काम सुरू झाले, कृष्णा घाटमाथ्यावर पोहचली, आज *कडेगाव परिसर* कधी *दुष्काळी* होता, यावर कोणी *विश्वास* ठेवणार नाही, अशी परिस्थिती आहे. पुढे याच योजनेमुळे अनेक खेडी , शेतकरी सधन झाले.. योजनेचे पाणी आज *टेंभू पासून १०० किलोमीटर पर्यंत* जिल्ह्यात पोहचली आहे. तर *सांगोला* भागातही *१७५ किलोमीटर* पर्यंत पोहचली आहे.

शेताला पाणी मिळाल्याने शेतकऱ्यांची *उन्नती* झाली, पण जर का *त्यावेळी अण्णांनी मंत्री पदावर पाणी सोडले नसते तर हे झालं असतं का ?* याचं उत्तर सापडत नाही. *आज त्यांचा वारसा संग्रामभाऊ लिलया चालवत आहेत,* अण्णांचे *गुण* त्यांचेकडे असल्याने त्यांचे राजकीय नुकसान झाले होते, पण भारतीय जनता पक्षाने त्यांना *पुणे पदवीधर मतदार संघाची उमेदवारी* देऊन न्याय दिला आहे. यामध्ये देखील ते नक्कीच *विजयी* होतील, कारण त्यांनी आज जे *विश्व* निर्माण केलं आहे ते *स्वतःच्या हिमतीवर* केलं आहे.

*सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष* म्हणून त्यांनी कार्यकिर्द गाजवली, राज्यातील *सर्व जिल्हा परिषदांची मोठ* बांधून त्यांनी शासनाकडून मागण्या मंजूर करण्यासाठी पुण्यात *सर्व जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींना एकत्र आणले,* त्या परिषदेची त्यांच्याकडे *अध्यक्ष पदाची जबाबदारी* होती. आगामी काळात येणाऱ्या *१५ व्या वित्त आयोगातील* महत्वाचे बदल या परिषदेमुळे होऊ शकले आहेत.

राज्यातील मोठ्या जिल्हा मध्यवर्ती बँका पैकी
*सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष* म्हणून त्यांनी आता पर्यंत काम केलं आहे. बँकेच्या माध्यमातुन *पदवीधर बेरोजगारांना कर्ज पुरवठा* करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. याचं प्रयत्नातून आज सांगली जिल्ह्यात अनेक तरुण उद्योजक निर्माण होऊ शकले आहेत. जिल्हा बँकेची गुणवत्ता आणि आर्थिक परिस्थिती आज मजबूत झाली आहे.

त्यांच्याकडे असणाऱ्या *संघटन कौशल्य* आणि नेतृताच्या गुणांमुळे त्यांनी *सांगली जिल्हा मजूर सहकारी सोसायटी, पंचायत समिती, दी रयत बँक एम्पलोयी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी* सारख्या संस्थांवर *पद* भूषवली आहेत. तर *ग्रीन पॉवर शुगर लिमिटेड गोपुज* हा *पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात अत्याधुनिक कारखाना* उभा केला, *संपतराव देशमुख मिल्क युनियन लिमिटेड रायगाव* चे ते *संस्थापक अध्यक्ष* आहेत, महालक्ष्मी सहकारी सूतगिरणी कडेपुर चे डोंगराई सहकारी सूतगिरणी मर्या कडेपुर चे आणि संपतराव देशमुख फळभाज्या उत्पादक खरेदी-विक्रीवर शितग्रह सहकारी संस्था कडेपुर चे ते *संचालक* आहेत. क्रीडाक्षेत्र आणि शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. *संपतराव देशमुख क्रिडा प्रबोधनीचे ते संस्थापक* असून *महाराष्ट्र राज्य शुटींग बॉल फेडरेशनचे उपाध्यक्ष* आहेत त्याचबरोबर *डोंगराई विकास शिक्षण संस्था कडेपुरचे संस्थापक सचिव* देखील आहेत.

संग्राम संपतराव देशमुख यांच्याकडे असणाऱ्या *समंजस स्वभावामुळे* पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात त्यांच्याकडे पूर्ण क्षमता असताना, देखील दिवंगत माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर त्यांनी *मोठ्या मनाने* आपला *दावा मागे* घेतला, त्या ठिकाणी विश्वजीत कदम यांना याठिकाणी संधी देण्याचे *मनाचे मोठेपण* त्यांनी यावेळी दाखवले होते.

अशाप्रकारे *स्वकर्तुत्वावर* संग्राम संपतराव देशमुख यांनी खूप मोठा कामाचा *डोंगर* उभा केला आहे. *पदवीधरांची ही निवडणूक* जरी आत्ता लागली असली तरी यापूर्वीच त्यांनी पदवीधरांसाठी सांगली जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्यात आणि सातारा जिल्ह्यात डोंगर उभा केला आहे. आता त्यांना *भारतीय जनता पक्षाने त्यांना पुणे पदवीधर मतदारसंघातून उमेदवारीची संधी दिली आहे.* सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, या जिल्ह्यांमध्ये संग्रामसिंह देशमुख यांचा असणारा *संपर्क* आणि भारतीय जनता पक्षाची *ताकद* नियोजन यावर ते नक्कीच *विजयाचा झेंडा* फडकवतील असे चित्र सध्या आहे. त्यांच्या *विजयाची आता केवळ औपचारिकताच बाकी राहिली आहे.* पुणे पदवीधर मतदारसंघातून उभे राहण्यापूर्वी त्यांनी *पदवीधरांसाठीचे अनेक नियोजन तयार ठेवले आहेत,* त्यामध्ये विविध विभागांकडे *शासनस्तरावर अडीच लाखांपेक्षा जास्त जागा रिक्त आहेत त्यासाठी प्रयत्न करणे, स्किल डेव्हलपमेंट, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, अंशकालीन योजना, स्पर्धा परीक्षा साठी अत्याधुनिक सुविधा, पदवीधरांचे संघटन पदवीधरांना व्यवसायाची संधी, मोफत प्लेसमेंट पदवीधर व्यावसायिकांना परवाने, पदवीधर शेतकऱ्यांचा समूह पदवीधर मंत्रालय, उद्योजक पदवीधरांसाठी कर्ज योजना पदवीधर शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ जुनी पेन्शन योजना, शिक्षकांचे प्रश्न असे पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी* त्यांनी नियोजन केले आहे. *शासकीय, प्रशकीय, राजकीय आणि सामाजिक अनुभवातून ते पदवीधरांना नक्कीच न्याय देतील असा विश्वास आहे.*

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close