महाराष्ट्र

अरुण लाड यांना निवडून आणण्यासाठी पाचही जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी कंबर कसावी :शरद पवार

पुणे:प्रतिनिधी

पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण गणपती लाड यांना निवडून आननेसाठी पाचही जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी कंबर कसावी, काहीही झाले तरी यावेळी हा मतदार संघ आपल्याकडे खेचून आणला पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांनी केले.

ते मुंबई येथे मंत्रालयात प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी पदवीधर मतदार संघाचे उमेदवार अरुण लाड, शिक्षक मतदार संघाचे उमेदवार जयंत आसगावकर, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कोल्हापूर चे पालकमंत्री सतेज पाटील,राज्यमंत्री डॉ विश्वजित कदम प्रमुख उपस्थित होते.

यावेळी पवार म्हणाले, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना पक्षाच्या सर्व लोकप्रतीनिधींना आज कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश देणेत आले आहेत. विरोधकांप्रमाणे आपण निवणूक आली की जनतेमध्ये जात नाही तर आपण नेहमी लोकांमध्येच असतो त्यामुळे जनतेचा आपल्यावर विश्वास आहे. पदवीधरांचे अनेक प्रश्न आहेत ते यापुढील काळात प्राधान्याने सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू. कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला कमी न समजता सर्वांनी या निवडणुकीत आपली उमेदवारी आहे असे समजून कामाला लागा. गाफील न राहता कामात ऱ्हावा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. भाजपा चे उमेदवार काय आहेत, किती नोंदणी केली, ते किती पक्षाशी प्रामाणिक आहेत, त्यांची सामान्य जनतेशी कसे संबंध आहेत हे सर्वश्रुत आहे त्यामुळे विजय आपलाच आहे फक्त राहिलेले दिवस कसून काम करा प्रत्येक पदवीधर मतदारापर्यंत पोहीचा असे ते म्हणाले.

यावेळी पाचहि जिल्ह्यात प्रचार यंत्रणा कशी राबवायची याबाबत मायक्रो प्लॅनिंग करनेत आले.

खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या, अरुण लाड हे एक निष्कलंक आणि राष्ट्रवादी पक्षाचे उमदे असे नेतृत्व आहे त्यांना चळवळीचा वारसा आहे त्यांना मिळालेल्या या संधीचे ते नक्की सोनं करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड, सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close