महाराष्ट्र

हम लडेंगे और जरूर जितेंगे : डॉ साधना अमोल पवार

पलूस : सांगली कोल्हापूर परत परत महापुराने वेढले जावू नये म्हणून आणि बाधित जनतेला नुकसानभरपाई मिळावी म्हणून तत्कालीन राज्य सरकारच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून लढा कोणी दिला?
पलुससारख्या छोट्या शहरातील एका ‘हाडाच्या डॉक्टरने…’

आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी महामार्गासाठी सरकार विनामोबदला लाटतंय,हे कळल्यावर त्यांच्या पाठीशी, जीवाचा धोका पत्करून कोण उभे राहिलं?
*डॉ अमोल पवार, एक सच्चा सामाजिक कार्यकर्ता..*

राज्य कोरोनात होरपळत असताना आपला प्रचार पूर्णपणे थांबवून कोणता उमेदवार लोकांच्या प्रबोधनासाठी झटत राहिला?

राजकारणात आत जावून बदल घडवून दाखवायचा आहे ह्या ध्येयाने पछाडले जावून अगडबंब संपत्ती असलेल्या प्रस्थापितांसमोर धाडसाने उभे राहिलेल्या या व्यक्तीला आपण जर निवडून दिलं तर पदवीधरांचे अनेक प्रश्न मार्गी लागतील.
संधी पुन्हा पुन्हा येत नसते अश्या माणसांना राजकीय स्थैर्यासाठी मदत करण्याची..
ना आमचे कारखाने आहेत ना आमच्या मागे कोणती कट्टर फौज आहे, आमचे कार्यकर्ते म्हणजे तुमच्यासारखी बदल घडवण्याची इच्छा बाळगणारे द्रष्टे लोक..!

आपण सगळे आपापला खारीचा वाटा उचलूया, कुणी फंड्स रेज करा, (आर्थिक मदत) कुणी आपापल्या परीने सोशल मीडियावर प्रचार करा,कुणी आपल्या माहितीतील लोकांना मतदानाच्या दिवशी बुथवर घेवून जा, कुणी आमच्या समर्थनार्थ छोटे छोटे व्हिडियो बनवून आम्हाला पाठवा.

आयुष्यात कधीच कोणाला कोणताही फेव्हर मागितला नाही, पण तुमचं मत मात्र हक्काने मागणार आहे.
सगळं शक्य आहे!

*हम लडेंगे और जरूर जितेंगे!*

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close