ताज्या घडामोडी

गरजू रूग्णांसाठी रक्तदान करा : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 17  : जिल्ह्यातील गरीब, गरजू अपघात ग्रस्त रूग्ण, भाजलेले रूग्ण, गरोदर माता व थॅलेसिमिया, हिमोफलिया या आजाराच्या रूग्णांना रक्ताची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्यातील शासकीय कार्यालये, रक्तदान शिबीर आयोजक व नागरिकांच्या मार्फत रक्तदान शिबीराचे आगाऊ नियोजन सांगली जिल्ह्यातील सर्व रक्तपेढ्यांसाठी केलेले आहे. शासकीय कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, स्वंयसेवी सामाजिक संस्था, रक्तदान शिबीर आयोजक व स्वैच्छिक रक्तदान करणारे रक्तदाते यांनी रूग्णसेवा सुरळीत ठेवण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात रक्तदान शिबीरामध्ये सहभाग नोंदवून रक्तदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
रक्तदान शिबीराची सुरूवात दि. 20 नोव्हेंबर 2020 पासून मिरज शहर पोलिस व वाहतूक शाखा पोलिस, पोलिस उपअधिक्षक कार्यालय मिरज पोलिस स्टेशन येथून होत आहे. जिल्हा रक्तदान शिबीर नियोजन आराखडा पुढीलप्रमाणे आहे. मिरज शहर पोलिस स्टेशन मिरज – 20 नोव्हेंबर 2020, आष्टा – 27 नोव्हेंबर 2020, तासगाव – 4 डिसेंबर 2020, खानापूर – 11 डिसेंबर 2020, इस्लामपूर – 18 डिसेंबर 2020, कुपवाड – 25 डिसेंबर 2020, कडेगाव – 1 जानेवारी 2021, कवठेमहांकाळ – 8 जानेवारी 2021, वाळवा – 15 जानेवारी 2021, विटा – 22 जानेवारी 2021, आटपाडी – 29 जानेवारी 2021, शिराळा – 5 फेब्रुवारी 2021, सांगली वाहतूक शाखा विश्रामबाग – 12 फेब्रुवारी 2021, जत – 19 फेब्रुवारी 2021. या सर्व ठिकाणी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close