ताज्या घडामोडी

पुणे पदवीधर मतदारसंघातून प्रा. डॉ. निलकंठ खंदारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पुणे  : पुणे पदवीधर मतदारसंघातून प्रा. डॉ. निलकंठ खंदारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल  केला.

सौरभ राव, विभागीय आयुक्त, पुणे यांचेकडे पुणे पदवीधर मतदारसंघाचा उमेदवारी अर्ज सादर केला, त्या वेळी कोविड19 च्या संदर्भाने फक्त २ व्यक्तींना आत प्रवेश होता. परंतु तरीही मला न सांगता शेकडीच्या संख्येने मला पाठिंबा देण्यासाठी आलेले माझे बांधव बघून आनंद आणि उल्हास द्विगुणित झाला. माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थ करून दाखवेन असे प्रतिपादन पुणे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार प्रा डॉ निलकंठ खंदारे यानि व्यक्त केला.
पुणे पदवीधर मतदारसंघात त्यांनी एक लाखापेक्षा जास्त मतदार नोंद केले आहेत. त्यांचा पाच जिल्हात मोठा मित्रपरिवार आणी दांडगा संपर्क आहे.
आपण पदवीधर बेरोजगारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करण्यासाठी, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सरकारी स्पर्धा परीक्षा केंद्र आणि हॉस्टेल ची स्थापना करणे, इंजिनिअर, पॅरा मेडिकल, फार्मसी, व्यवस्थापन, कृषी तसेच इतर क्षेत्रासाठी आपल्याकडे मास्टर प्लान आहे आणि तो राबविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले . यापूर्वी च्या कोणत्याही पदवीधर आमदाराने जे काम केले नाही ते आपण करून दाखवू असे ते म्हणाले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close